खरं तर आपल्याला जीवनगाणे छेडायचे आहे. पण उदाहरणाशिवाय त्या अवस्था समजणं अशक्य असल्याने आपण उदाहरणांचाच आधार घेणार आहोत.आज आपण माठाचा आधार घेतला आहे.तहान लागली असेल तर पाणी अत्यावश्यक आहे. मग ते गार,कोमट कसही चालेल.पण तहान लागलेली आहे,थंड पाणी मिळालं तर फार बरं होईल?असा विचार मनात सुरू आहे,आणि तेवढ्यात माठ दिसला.आपोआप पावलं तिकडं वळणार.ते थंड पाणी पोटात गेलं की तृष्णा तृप्तीचा आनंद मिळणार.
आपण कुटुंब प्रमुख असाल तर हा लेख आपल्यासाठीच आहे. आपण कुटुंब किती आनंदात चालवता यालाच खूप महत्त्व आहे.कर्ता पुरुष सर्वाधिक घराबाहेर असतो.बाहेरची कर्म त्या परिवाराची उंची कमी जास्त करत असतात.कुटुंबातील व्यक्तींचा मानमरातब हा त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषांच्या कर्मावर अवलंबून आहे.अतिरेकी प्रवण क्षेत्रात शांतता अनुभवता येईल का?
आत्ता युक्रेनमधे आमच्याकडील अनेक भारतीयांनी ती अशांतता अनुभवली. देश म्हणजे आपलं घरच आहे. बाहेरची अशांतता घरातील शांततेचा भंग करते.कुटुंबातील बाहेर असलेल्या कर्ता पुरुष, स्रीवर घराची जबाबदारी असते.कर्म आणि त्यातुन अर्थार्जन हा अतुट भाग आहे.बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळुन घराला माठासारखं थंड ठेवता येणं हे खरं कसब आहे. ते कसब हाशिल करणं फार अवघड नाही.जगण्यात काही बदल केले की घराचं गोकुळ व्हायला वेळ लागणार नाही.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/HcD2Wkn

By News

Leave a Reply

Your email address will not be published.