
संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत असणारी सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट (MDL)मध्ये विविध पदांची बंपर भरती केली जणार आहे.
या कंपनीत कुशल, अकुशल आणि अकुशल स्पेशल ग्रेड अशा प्रकारच्या एकूण 1,501 नॉन एक्झिक्युटिव्ह पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
इच्छुक उमेदवार 8 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्जासोबत उमेदवारांना 100 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे.
अशी असेल निवड प्रक्रिया :
● पहिल्या टप्प्या लेखी परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.
● लेखी परीक्षेतील कामगिरी आणि उमेदवारांचा अनुभव याआधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
● या यादीत आवश्यक पदांच्या तीन ते पाच पट उमेदवारांची निवड केली जाईल.
● त्या उमेदवारांना स्कील टेस्टसाठी बोलावले जाईल.
● अंतिम निवड यादी उमेदवारांचा अनुभव, लेखी परीक्षेतले गुण आणि स्कील टेस्टमधील गुण यांच्याआधारे तयार करण्यात येईल.
इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट mazagondock.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
from https://ift.tt/3AEamwo