महाराष्ट्र पुन्हा लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर ?

 

 

Table of Contents

पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्येत रोजच वाढ होत आहे. राज्यातील १० मंत्री व २० आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सरकारची चिंताही वाढली असून संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘ कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागांत केली जाईल,’ असे अजित पवार म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लॉकडाऊन केले आहे. देशातील अनेक राज्यांत रात्रीच्या वेळेस लॉकडाऊन करण्यात आले आहे.
एकमेकांच्या समोर येतो तेव्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होतो. त्यामुळेच या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे,’ असं अजित पवार म्हणाले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण स्वत: काळजी घेत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. ‘माझे कार्यक्रम सुद्धा मी वेळे अगोदरच घेतो. त्यामुळे गर्दी कमी होते आणि मीच जर नियम मोडले तर बाकीच्यांना नियम काय सांगणार? पाच दिवसांच्या अधिवेशनात १० मंत्री आणि २० आमदार पाॅझिटिव्ह झाले. काही दिवस अजून अधिवेशन चालू ठेवले असते तर अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ आणि आमदार कोरोना पाॅझिटिव्ह झाले असते, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

from https://ift.tt/32UGPlw

Leave a Comment

error: Content is protected !!