
मुंबई : ओमायक्रॉनचा संसर्ग आणि कोरोनाचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ( गुरुवारी) 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थिती लावणार आहेत.
सध्या महाराष्ट्रात दररोज 25 ते 30 हजार कोरोनाबाधित आढळत आहेत. मात्र त्या तुलनेत रुग्णांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण, उपलब्ध ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्स बघता सध्या राज्यात लॉकडाऊन लावण्याची सध्या गरज नाही अशी भूमिका राज्य सरकार मांडणार आहे.
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होत असल्याचं दिसून येतंय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असून ते महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती केंद्र सरकारला देणार आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे मांडणारं ‘हे’ मुद्दे.
राज्याने केंद्राकडे कोविशिल्ड 60 लाख कोव्हॅक्सिन 40 लाख डोसची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण करण्याची विनंती.
कोविन अॅपवरती अशावेळी सध्या 6 नावं रजिस्टर होतात. त्याची मर्यादा 10 करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारकडून जो निधी येतो तो निधी कोविड काळात काम करणाऱ्या मनुष्यबळासाठी वापरण्याची परवानगी केंद्राकडे मागणी करणार.
सध्या राज्यात ‘अशी’ परिस्थिती आहे.
ऑक्सीजन बेडसाठी 2.82 टक्के खाटा व्यापलेल्या आहेत.
आयसीयू खाटा 3.2 टक्के व्यापलेल्या आहेत.
व्हेंटिलेटर बेड 6 टक्के व्यापलेल्या आहेत.
from https://ift.tt/3fmIkfb