महाराष्ट्रातील आणखी एका बडया नेत्याला कोरोनाची बाधा !

 

Table of Contents

जालना: राज्यातील बड्या नेत्यांना कोरोना संसर्गाची मालिका सुरुच आहे. राज्यातील मंत्र्यांपाठोपाठ आता केंद्रीय राज्यमंत्री देखील कोरोना बाधित होत असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना देखील कोरोना संसर्ग झाला आहे. दानवे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. स्वत: ला आयसोलेशन करुन घेतले असून संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन दानवे यांनी केले आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लक्षण जाणवत असल्याने आपण टेस्ट केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दानवे यांनी ट्विटर तसेच फेसबुकवर पोस्ट केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेत असून संपर्कातील सर्वांनी कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान,केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचेही समोर आले आहे. कोरोनासदृश्य लक्षणे आढळल्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करुन घेतली. त्यानंतर त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्या विलगीकरणात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात घेत आहेत.
▪राज्यात 40 हजार कोरोना रुग्णांची नोंद.
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात काल (शुक्रवारी ) दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

from https://ift.tt/32XZ3mo

Leave a Comment

error: Content is protected !!