
दरवर्षी मकरसंक्रांतीला जणू पतंगाची स्पर्धाच पाहायला मिळते. पण तुम्हाला माहितीय मकरसंक्रांतीलाच पतंग का उडवला जातो? नसेल तर आजच्या लेखामध्ये तुम्हाला याचे उत्तर नक्कीच मिळेल…
तसे पहिले तर प्रत्येक सणांना धार्मिक महत्त्व आहेच आणि त्यामागे शास्त्रीय कारणेही आहेत. ही कारणे समजून घेतली तर आपली संस्कृती किती प्रगत आहे याचा तुम्हाला अभिमान वाटेल, एवढं नक्की!
संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडी असते. ऊनही फार कमी असल्याने स्थूलपणा जाणवतो. थंडी अनेक त्वचारोगांना आमंत्रण देते. याकाळात त्वचा रुक्ष होते. म्हणूनच शरिराची हालचाल व्हावी यासाठी हा खेळ खेळला जातो.
मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या काळात सूर्याची किरणे अंगावर पडली तर त्याचा शरीरराला फायदा होतो. त्वचेसाठी सूर्यकिरणे मिळावीत यासाठी हा खेळ खेळला जातो.
निमित्ताने का होईना पतंग उडवण्यासाठी थंडीतून लोक घराबाहेर पडतात छतावर येतात. त्यामुळे पुरेपुर ऊन शरीराला मिळते.
मात्र पतंग उडविताना काही गोष्टींची काळजी जरूर घ्या. कारण आनंदाचे दु: खामध्ये रूपांतर होण्यास वेळ लागत नाही.
from https://ift.tt/3tnJC1G