![](https://parnerdarshan.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220313-WA0000.jpg)
भारतीय लष्कराने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) साठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…![](http://parnerdarshan.com/wp-content/uploads/2022/02/IMG-20220203-WA0002.jpg)
रिक्त जागा – शॉर्ट सर्व्हिस कमिशन – एकूण 191 पदे (अविवाहित – 175 पदे,पुरुष – 14 पदे, अविवाहित महिला आणि संरक्षण कर्मचारी विधवा – 2 पदे)
निवड कशी होईल? : एसएसबी मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) कोर्स ऑक्टोबर 2022 पासून ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA), चेन्नई, तामिळनाडू येथे सुरू होण्याची शक्यता आहे.![](http://parnerdarshan.com/wp-content/uploads/2021/10/IMG-20211028-WA0008.jpg)
पात्रता काय? : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून अभियांत्रिकी पदवी प्राप्त असावी.
वयोमर्यादा काय? : किमान वय 20 तर कमाल वय 27 वर्षे असावे.
स्टायपेंड किती? उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान दरमहा 56 हजार 100 रुपये स्टायपेंड देखील दिला जाईल.![](http://parnerdarshan.com/wp-content/uploads/2021/11/IMG-20211114-WA0011.jpg)
अर्ज करण्याची मुदत : 6 एप्रिल 2022 पर्यंत.
पात्र उमेदवार भारतीय लष्कराच्या वेबसाईट joinindianarmy.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
from https://ift.tt/0MAVlaP