
भारतीय रेल्वेकडून तब्बल 2422 पदांवर अप्रेंटिस भरती करण्यात येत आहे. मध्य रेल्वे विभागात फिटर, वेल्डर, टर्नर, कारपेंटर, पेंटर, टेलर, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, प्रोग्रामिंग अँड सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट सोबतच इतरही ट्रेड्ससाठी नोकरीची संधी आहे.
पत्रकानुसार सर्व पदांसाठीच्या अप्रेंटिसशिपसाठीचा कालावधी हा एक वर्षाचा असेल. अर्ज करण्याची मुदत 16 फेब्रुवारी 2022 आहे.
थेट निवड : या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची चाचणी परीक्षा होणार नसून थेट निवड केली जाणार आहे. यासाठी 10 वी आणि आय़टीआयमध्ये मिळालेल्या गुणांना अनुसरून गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे.
पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून दहावी परीक्षेत किमान 50 टक्के गुण, सोबत ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट जे NCVT अथवा SCVT मान्यताप्राप्त असेल.
अर्जदारांची निवड मुंबई, क्लस्टर भुसावळ, पुणे, नागपुर आणि सोलापुरमधील विविध युनिट्सवर केली जाईल.
वयोमर्यादा : किमान वयोमर्यादा 15 वर्षे आणि कमाल 24 वर्षे इतकी तर आरक्षित प्रवर्गांसाठी सूट.
इच्छुक उमेदवारांनी www.rrccr.com या संकेतस्थळावरुन नोकरीसाठीचा अर्ज करावा.
अर्ज कसा करायचा?
● सर्वात अगोदर अधिकृत संकेतस्थळावर जा.
● आता Recrutiment लिंकवर क्लिक करा.
● आता फॉर्म आणि नंतर फी भरा.
● आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्या.
● फॉर्म अपलोड केल्यानंतर एक प्रत स्वत:कडे ठेवा.
from https://ift.tt/354pszG