पारनेर :तालुक्यातील दरोडी गावामध्ये आलेल्या बिबट्याने गोरख पावडे यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी न घाबरता त्यांच्या पत्नीने बिबट्याशी दोन हात करून आपल्या कुंकवाच्या धन्याचे प्राण वाचवण्यासाठी प्राणपणाने लढा दिला. त्यातच त्यांचा पाळीव कुत्रा आणि वडील मदतीसाठी धावून आले. अशाप्रकारे एकत्रितरीत्या बिबट्याला पळून लावण्यात पावडे कुटूंबियांना यश आले. त्यांच्या या शौर्याला आमदार निलेश लंके यांनी दरोडी येथे जाऊन दाद दिली. त्याचबरोबर बिबट्याशी चार हात करणाऱ्या त्या तिघांचे त्याचबरोबर प्रामाणिक कुत्र्याचे ही कौतुक केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरोडी गावातील चापळदरा याठिकाणी राहणाऱ्या गोरख पावडे यांच्या घरासमोर बिबट्या आल्याने कुत्र्याचा आवाज आला. त्यामुळे रात्रीच्या वेळी ते घराच्या बाहेर आले. आणि अचानक समोर बिबट्या दिसला. त्यांने त्यांच्यावर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. मात्र अत्यंत निकराने गोरख पावडे यांनी त्याच्याशी दोन हात केले. जोरात आवाज आल्याने त्यांच्या पत्नी संजना सुद्धा बाहेर आल्या. बॅटरी लावून पहात असताना त्यांच्या पतीवर बिबट्या हल्ला करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याची शेपटी व पाय ओढले. त्यामुळे बिबट्याची काहीशी पकड कमी झाली. मात्र त्याने गोरख पावडे यांच्या हाताला चावा घेतला. त्याचबरोबर मानेवर पंजा मारला. काही वेळातच त्यांचे वडील दशरथ पावडे बाहेर आले. त्यांनी व कुत्र्याने बिबट्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. कुत्रा मानेवर बसल्यानंतर बिबट्याने पावडे यांना सोडले. लागली त्याच्या मानेवर ग्रॅनाईने हल्ला चढवण्यात आला. त्यामुळे घायाळ झालेला बिबट्याने त्या ठिकाणाहून पळ काढला. गोरख पावडे आणि त्यांच्या पत्नी व वडिल आणि कुत्र्याने मोठे धाडस दाखवून प्रतिकार केला. त्यामुळे प्रामुख्याने पावडे यांचा जीव वाचला. विशेषता त्यांच्या पत्नीने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.
दरम्यान बुधवारी सायंकाळी आमदार निलेश लंके यांनी पावडे कुटुंबीयांची भेट घेतली. आणि त्यांची विचारपूस करत घडलेल्या प्रसंगांमध्ये अत्यंत धैर्याने आणि न घाबरता केलेल्या प्रतिकारबाबत कौतुक केले. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठान चे राज्य सचिव ॲड राहुल झावरे, युवा नेते जितेश सरडे, सत्यम निमसे, निलेश लंके प्रतिष्ठान दरोडी चे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य दिनेश चौगुले,
माजी सरपंच अनिल पावडे ,माजी उपसरपंच महमंद मुजावर लक्ष्मण कड, अनिल भोसले नितिन पावडे ,राजु पावडे ,दिपक पावडे , रावसाहेब कड, मोहन पावडे, फक्कड पावडे कैलास पावडे, पापा शेख, सतिश गिरी, रावसाहेब पावडे उपस्थित होते
▪भगिनीचे काळीज वाघिणीचे !
दरोडी येथील आमच्या संजना पावडे नावाच्या भगिनी आपल्या पतीवर होत असलेल्या बिबट्याचा हल्ला पाहून स्वतः हा त्यांच्या मदतीला धावून गेल्या. त्यांनी न घाबरता त्या बिबट्याचे पाय आणि शेपटी ओढली आपल्या पतीचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या या भगिनी चे करावे तितके कौतुक कमी आहे. तिचे वाघिणीचे काळीज असून बिबट्याच्या लढाईमध्ये पतीला खंबीर साथ देत खऱ्या अर्थाने शौर्य दाखवले. अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिली.
▪कुत्र्याच्या पाठीवरही कौतुकाची थाप!
असे म्हणतात जीव लावले की रानाचे पाखरू आणि पाळीव प्राणी सुद्धा जवळ येतात. कुत्रा आपल्या घराचे राखण करतो. आपल्या धन्याशी अत्यंत प्रामाणिकपणे राहणारा हा प्राणी आहे. त्याचा प्रत्यय गोरख पावडे यांच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्याचा प्रसंगी आला. त्यांच्या काळया रंगाच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याच्या मानगुटीवर बसून आपल्या मालकाचा जीव वाचवला. त्याच्या पाठीवर आमदार निलेश लंके आणि कौतुकाची थाप मारली.

from https://ift.tt/uEYyfxm

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *