
पारनेर : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील फिनिक्स या सामाजिक संस्थेने नववर्षानिमित्ताने रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम करणाऱ्या कष्टकरी कामगारांना मोफत कपडे वाटप नवीन वर्षाची भेट दिली आहे.
नगर – कल्याण महामार्गावर परिसरात राहणाऱ्या या कष्टकरी कामगारांना कपडे वाटप करून आनंद द्विगुणित केला आहे. पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे व फिनिक्स या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. विलास महाराज लोंढे यांच्या हस्ते या कपड्यांचे वाटप रविवारी करण्यात आले.
फिनिक्स या सामाजिक संस्थेने या ही वर्षी भटक्या परिवारांना कपडे देऊन नववर्षाचे स्वागत केले आहे.टाकळी ढोकेश्वर येथे बाह्यवळण मार्गावर अनेक भटके परिवार पाल ठोकून रहात आहेत.आज ते दुसऱ्या गावाकडे जाण्यासाठी निघाले असता,१४० अबालवृद्धांना कपडे देऊन निरोप देण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे यांचे हस्ते हे कपडे वाटप करण्यात आले.फिनिक्सच्या वतीने वर्षभर कपडे वाटप केले जाते.समाजातील सधन घटकांनी वापरुन जुने झालेले कपडे आनंदसिंधु वृद्धाश्रमात जमा करण्याचे अवाहन यावेळी अध्यक्ष विलास महाराज लोंढे यांनी केले आहे.
from https://ift.tt/3mMBP9B