प्रभु श्रीरामांचा त्याग अदभूत आहे !

 

Table of Contents

युवा अवस्थेत सर्व हवं असतं.जगाला मुठीत घेण्याची इच्छा असते.ते मिळवण्यासाठी जीवाचा अटापिटा करतात.त्यात भोगलालसा मुख्य आहे. आवडती पत्नी मिळवणं,स्वप्नातला बंगला सत्यात उतरवणं,अलिशान कार खरेदी करता येणं,सोनंनाणं परिधान करता येणं हेच मुख्य लक्ष युवावस्थेत असते,आणि का असु नये?मनुष्य जन्म मिळालाय हे सर्व प्राप्त करणं शक्य आहे. पण जीवन त्या पलिकडे आपल्याला आवाज देत आहे. हा आवाज कित्येकांना ऐकुच येत नाही. कुणाच्या भल्यासाठी, समाधानासाठी सर्वस्व अर्पण करणारी जिगरबाज तरुणाई आता दिसत नाही हेच खरं आहे.
प्रभु श्रीराम त्यागाचं अत्यंत बोधक आणि बोलकं उदाहरण आहे. हातात आलेलं पद,संपदा,सुख कोण त्यागायला तयार होईल?पदासाठी एकमेकांचं जीवन संपवणारी अगणित उदाहरणं आपल्या ऐकिवात आहेत.कुणाचा शब्द झेलण्यासाठी,पाळण्यासाठी जगणारी तरुणाई विरळीच.राम त्याचा दिशादर्शक आहे.
रामानं राजगादीचा त्याग करुन वनवास पत्करला पण हे बंधू लक्ष्मणाला अजिबात रुचले नाही. त्यानं आई कैकयीला दोष देत रामाला विनंती करु लागला की आपण वनवास पत्करु नये.त्याला समजावताना रामाच्या भावना ग.दि.मांनी गीतरामायणात अत्यंत सूक्ष्म पणे शब्दबद्ध केल्या आहेत.
दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा
माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा
अंत उन्‍नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा
जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्‍निंच्या फळांचा?
तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा
जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा
दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा
नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा
नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा?
संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा
पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा
सज्जनहो या भावना आपण जगु शकलो तर जीवन धन्य झाल्याशिवाय रहाणार नाही.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/qI02ptE

Leave a Comment

error: Content is protected !!