हल्ली आपला फोन अनलॉक करण्यासाठी फिंगरप्रिंटचा वापर केला जातो. मात्र बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की, जर माझ्या हाताला भाजलं, काही दुखापत झाली तर माझ्या हाताचे फिंगरप्रिंट बदलतील का? चला, तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
लक्षात घ्या, आपला हात भाजला तरी फिंगरप्रिंट बदलत नसतात. जखम झाल्यावरही हाताचा ठसा आहे तसाच राहतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगात एवढी मोठी लोकसंख्या असली तरी कोणत्याही मनुष्याच्या बोटाचे ठसे इतर कोणत्याही मनुष्याशी जुळत नाहीत. माणसाचे फिंगरप्रिंट एकदा तयार झाले की, ते आयुष्यभर तसेच राहतात. याचे कारण म्हणजे मानवी जीन्स, पर्यावरण यांसारखे घटक आहेत.
तज्ज्ञांच्या मते, मूल आईच्या गर्भाशयात वाढत असताना त्याच्या बोटांचे ठसे तयार होतात. तसेच हातांमध्ये काही समस्या असेल आणि बोटांचे ठसे गायब झाले तर काही महिन्यांत ते पुन्हा आहे त्याचस्थितीत येतात. वयानुसार व्यक्तीच्या फिंगरप्रिंटमध्ये बदल होत नाही. मात्र, तरुण वयात बोटांच्या ठशांमध्ये लवचिकता येते. जसजसे वय वाढते तशी-तशी ही लवचिकता संपते. मात्र आयुष्यभर मानवी बोटांच्या ठशाच्या संरचनेत कोणताही बदल होत नाही, हे विशेष.

from https://ift.tt/3GheEfq

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *