
शिरूर : प्रजासत्ताकदिना निमित्त दिल्लीमधील राजपथावर पार पडलेल्या चित्र रथांच्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या चित्र रथाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राची जैवविविधता या विषयावर हा चित्ररथ आयोजीत केला होता. या चित्ररथात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तिर्थक्षेत्र भिमाशंकर अभयारण्यातील शेकरू व ब्लू माॕरमाॕन प्रजातींच्या फुलपाखरांच्या प्रतिकृतींचा पथसंचलनात समावेश होता.
बुधवारी देशात ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. राजधानी दिल्लीतील राजपथावरच्या संचलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले होते. फक्त देशच नव्हे तर जगालाही भारताच्या शक्तीचे दर्शन घडले आहे. संपूर्ण देशाला दरवर्षी या दिवसाची उत्सुकता लागलेली असते. याशिवाय देशभरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
त्याचबरोबर या चित्ररथावर साताऱ्याच्या कास पठाराची प्रतीकृती साकरलेली होती. यात कासपठारवरील फुले, विदर्भातील पट्टेरी वाघ, राज्य पक्षी हरीयाल, राज्य प्राणी शेकरु, राज्य फुलपाखरु ब्यू माॕरमाॕन, महाराष्ट्रात येणारा परदेशी पाहुणा फ्लेमींगो (रोहित), दुर्मिळ होत चाललेला माळढोक पक्षी, नव्याने सापडलेला गुबेर नटोरिया ठाकरियाना हा रंगीत खेकडा या बरोबरीनेच पश्चिम घाटात विशेषतः साताऱ्याच्या चाळकेवाडी व सडावाघापुरच्या घाटात आढळणाऱ्या पंख पसवणारा सरडा यालाही चित्ररथात मानाचे स्थान मिळाले.
या चित्ररथाची राजपथावरील झलक पाहताना अभिमानाने ऊर भरुन आला. कास पठारावरील जैवविधतेचे दर्शन घडले. या सरड्याच्या प्रजातीचे संरक्षण व अभ्यास करणाऱ्या आम्हा वन्यजीव प्रेमींना व वनविभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना खरच या गोष्टीचा आज खूप खूप अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली.
from https://ift.tt/3tYt28W