मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला धक्कादायक माहिती दिली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, अशी माहिती कुंटे यांनी दिली. देशमुख त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्यामार्फत या याद्या पाठवायचे, असेही कुंटे यांनी सांगितले आहे. अनिल देशमुख यांच्याकडे काम करत असल्यामुळे आपण नकार देऊ शकत नव्हतो, असे सीताराम कुंटे यांनी ईडीकडे दिलेल्या जबाबात सांगितले आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांवरील आरोपांच्या चौकशीत राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला जबाबात सांगितले की, ‘पोलीसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख वेळोवेळी अनधिकृत याद्या पाठवायचे’ यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार आहेत.
▪यादी नाकारता येत नव्हती कारण ..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७ डिसेंबरला ईडीने नोंदवला होता. कुंटे यांनी सांगितले की, अनिल देशमुख त्यांच्या माणसांकडून मुख्यत्वे, संजीव पलांडे व इतर व्यक्तीकडून यादी पाठवायचेत. त्यातील काही नावं अंतिम यादीत असायची, या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अनिल देशमुख सध्या १०० कोटींच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. राज्य सरकारने नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोर त्यांची सुनावणी सुरु आहे.
▪परबमीर सिंग यांच्या आरोपानंतर चौकशी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं ‘टार्गेट’ दिल्याचा दावा केला होता. यापत्रानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता.
▪भाजप आक्रमक होण्याची शक्यता
सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबाची माहिती माध्यमांतून प्रकाशित झाल्यानंतर भाजपकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणंही महत्त्वाचे ठरणार आहे.

from https://ift.tt/XW0G5NaoK

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *