पारनेर : लोकनेते आमदार नीलेश  लंके यांचा १० मार्च रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा झाल्यानंतर तालुक्यात विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येऊन वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. वनकुटे येथे वैष्णवी महिला सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड. स्नेहा झावरे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन आमदार लंके यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पैठणीचा खेळ, उखाणे, गप्पा – टप्पा करीत महिलांनी धमाल मस्ती करीत या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

निवेदक उध्दव काळापहाड यांच्या ‘रंगणार खेळ पैठणीचा, स्मार्ट होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात महिलांनी उर्स्फुतपणे सहभाग नोंदवत विविध स्पर्धांचा आनंद लुटला. महिलांनी नवनविन उखाणे घेत धमाल उडवून दिली. तब्बल दोनशेपक्षा अधिक महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक फेरीगणिक महिलांचा उत्साह वाढत होता. अखेर वैशाली बाळू गागरे या पैठणीच्या तर शारदा राजू डहाळे या सोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या. अनिता साळवे यांनी तिसऱ्या क्रमांकाचे बक्षिस पटकावले. जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. राणीताई नीलेश लंके यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

यावेळी पारनेर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सुरेखाताई अर्जुनशेठ भालेकर, महिला बालकल्याण समितीच्या सभापती प्रियांकाताई सचिन औटी, नगरसेविका निताताई विजय औटी, कुमारी हिमानी बाळासाहेब नगरे या उपस्थित होत्या. वनकुटे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वनकुटेचे सुपुत्र तन्मय मुसळे तसेच वासुंदे येथील विजयराज सैद यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत अंतिम निवड झाल्याबददल राणीताई लंके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तन्मय मुसळे याच्या आई वडीलांनी अतिशय खडतर परिस्थितीशी सामना करून मुलास शिक्षण दिले. तन्मय याने वडीलांच्या कष्टाची जाणीव ठेवत उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्याच्या आईवडीलांचा सरपंच अ‍ॅड. राहूल झावरे यांच्या वतीने साडीचोळी तसेच पोशाख भेट देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानानंतर तन्मयच्या आईवडीलांच्या  डोळयात आनंदाश्रू उभे राहिले. सौ. सुरेखा काळे यांना राहुरी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. काळे यांचाही यावेळी राणीताई लंके यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास सरपंच अ‍ॅड. राहूल झावरे, उपसरपंच अर्जुन कुलकर्णी, कारभारी मुसळे, आप्पासाहेब गागरे आसाराम मुसळेे, बबन काळे, रामदास शेलार, अजित गागरे, भाउसाहेब सैद, जालिंदर बावळे, बबन मुसळे आदी उपस्थित होते.

from https://ift.tt/ATtOEHU

By News

Leave a Reply

Your email address will not be published.