
पारनेर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा समिती आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धा दादा पाटील राजळे महाविद्यालय,आदिनाथनगर येथे संपन्न झाल्या.सदर स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १६ महाविद्यालयांनी मुलांच्या गटात सहभाग नोंदवला होता व ७ महाविद्यालयातील मुलींनी प्रतिनिधीत्व केले होते. या स्पर्धेत न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेरचा खेळाडू करण गहाणडूले याने प्रथम क्रमांक पटकावला. सांघिक कामगिरीमध्ये पारनेर महाविद्यालय मुलांमधे उपविजयी ठरले. तर मुलींच्या स्पर्धेमध्ये भाग्यश्री भंडारी हिने प्रथम क्रमांक तर शीतल भंडारी हिने चौथा क्रमांक पटकावून पारनेर महाविद्यालयाला विजेतेपद मिळून दिले.या सर्व खेळाडूंची आंतरविभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी.डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर,ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य राहुल झावरे पाटील व सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
या सर्व खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.आहेर,उपप्राचार्य डॉ.दिलीप ठुबे,जिमखाना विभागप्रमुख डॉ.संजय गायकवाड,क्रीडा परीक्षक आवारी सर, प्रा.बाबाजी साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
from https://ift.tt/3KCckSu