पारनेर : दक्षिण आशियाई शिक्षण पुरस्कारासाठी महाविद्यालयाने नामांकन सादर केले होते. या आधारे पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर झाला तर याच संस्थेच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर यांना उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे.

या पुरस्कारासाठी दक्षिण आशियातून २५९ नामांकनं प्राप्त झाली होती. त्यातून उत्कृष्ट महाविद्यालय व व आदर्श प्राचार्य असे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये महाविद्यालयाने राबविलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, महाविद्यालयातील प्राध्यापकांचे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील योगदान, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेले समाजाभिमुख कार्य या सर्व बाबींचा एकत्रित विचार करून हा पुरस्कार प्राप्त झाल्याने महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

यापुर्वी महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार,राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट विद्यार्थी विकास मंडळ महाविद्यालय पुरस्कार, चेतना वार्षिकांकास उत्कृष्ट वार्षिकांक पुरस्कार असे अनेक पुरस्कार महाविद्यालयाला प्राप्त झाले आहेत तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांना यापुर्वीही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित केले आहे.

डॉ. आहेर यांचे आजपर्यंत शंभरपेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजीआ. नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव ॲड विश्वासराव आठरे पाटील, खजीनदार मुकेश मुळे, ज्येष्ठ विश्वस्त सिताराम खिलारी, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य राहुल झावरे पाटील व सर्व संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे यासाठी संस्थेने पारनेर येथे महाविद्यालयाची स्थापना केली. या महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी हीत लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवत असतात तसेच महाविद्यालयातील प्रत्येक घटक समाजाप्रती आपली बांधीलकी जोपासत आहे. म्हणूनच महाविद्यालय व प्राचार्यांना मिळालेला पुरस्कार महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा आहे.
माजी आ.नंदकुमार झावरे
अध्यक्ष,अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, अहमदनगर

from https://ift.tt/3HcqaZL

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *