पारनेर मतदारसंघातील विद्यार्थीही होणार ‘डिजिटल’ !

 

Table of Contents

पारनेर : विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी पाठयपुस्तकांबरोरच कला, क्रीडा, मूल्य शिक्षणाबरोबर अत्याधुनिक डिजिटल शिक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. आमदार निलेश लंके यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून शिक्षणाच्या बाबतीत देशात आदर्श मतदारसंघ उभा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या कामासाठी प्रसंगी संपूर्ण आमदार निधी खर्च करण्यासही मागे पुढे पाहणार नसल्याचे आ. लंके यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, या उपक्रमाच्या अनुषंगाने शिक्षकांशी चर्चा तसेच संवाद साधण्यासाठी सोमवार दि. ११ एप्रिल रोजी पारनेर येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात शिक्षक कार्यप्रेरणा व गुणगौरव सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती पारितोषिक विजेते तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड, सतिश भालेकर, चंद्रकांत मोढवे यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहीती देताना आ. लंके म्हणाले, राज्याला शिक्षक पुरविणारा पारनेर तालुका अशी माझ्या मतदारसंघाची ख्याती आहे. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये ‘स्पार्क’ आहे. अनुभवी शिक्षकांच्या माध्यमातून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देवून त्यांचा सर्वांगिण विकास करण्याचा माझा माणस आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून येत्या काही वर्षात राज्यात शिक्षणाच्या बाबतीत मॉडेल मतदारसंघ उभा करण्याचा आपला निर्धार आहे. मतदारसंघातील शरदचंद्र पवार कोव्हीड सेंटरची ख्याती देशातच नव्हे तर जगभर झाली. शिक्षणाच्या बाबतीतही माझा मतदारसंघ वेगळया उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी आता आपण पुढाकार घेणार आहोत. पुस्तकी शिक्षणाबरोबरच डिजीटल शिक्षण, खेळ, सांस्कृतीक शिक्षण, सांप्रदायीक शिक्षण देण्यात येउन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न या उक्रमाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
मतदासंघातील प्राथमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शाळांमध्ये शिक्षणाव्यतिरिक्त इतर उपक्रमांकडे लक्ष दिले जात नाही. विविध स्पर्धा परिक्षांमध्ये ग्रामिण विद्यार्थी मागे पडलेले दिसतात. मतदासंघातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी माझी जबबदारी म्हणून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यातील पानोली तसेच नगर तालुक्यातील आकोळनेर येथील जि. प. च्या डिजीटल शाळा अत्याधुनिक शाळा म्हणून देशात ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. संपूर्ण मतदासंघात अशा शाळा उभ्या करण्यासाठी होतकरून शिक्षकांची एक टीम उभी केली जाणार आहे. त्यासाठीच ११ एप्रिल रोजी नव्या वर्षाची तयारी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गुणवंत शिक्षकांचा गौरवही करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी हाती घेतलेली ही योजना आपण सोडणार नाही. शिक्षणाचे महत्व कळाले पाहिजे असे सांगतानाच विविध विकासकामांबरोबरच विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्यासाठी प्रसंगी आपण संपूर्ण आमदार निधी या योजनेवर खर्च करू असेही आ. लंके यांनी यावेळी सांगितले

from https://ift.tt/szqY861

Leave a Comment

error: Content is protected !!