पारनेर पब्लिक स्कूलचा साईराज कडूस राज्यात तिसरा !

Table of Contents

पारनेर :महाराष्ट्र राज्य परिषद शिक्षण मंडळा अंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा इयत्ता पाचवी व आठवीचा निकाल नुकताच जाहीर झाला.विद्यालयाला यावर्षी देखील अप्रतिम यश मिळाले.इयत्ता पाचवीमधील अकरा विद्यार्थी व इयत्ता आठवी मधील दहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे .पाचवी मधील कुमार साईराज अशोक कडूस या विद्यार्थ्यांने २८८ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक व जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला आहे.

त्याचप्रमाणे कुमारी स्वराली जयवंत निमसे २६०,सक्षम दिपक चत्तर २३६, अवधुत भीमसेन ठुबे २१२, श्रावणी दत्तात्रय काकडे २०८, सिद्धांत विजय ठुबे २०२, तनिष्क मुकुंद , १९८ दीक्षा प्रशांत , १९४ काव्या राहुल पवार १९४, राजनंदिनी गजानन अंबुले १९०, सुरज मच्छिंद्र बोरुडे १९० असे एकूण अकरा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षामध्ये यश संपादन केले आहे .

इयत्ता आठवीमध्ये गौरवी महेश ठुबे २ ३०,शंतनु सुरेश तांबे २२०, शुभम शिवाजी तांबे २१४, करण दादाभाऊ ठुबे २०२, वेदांत बाळासाहेब पुजारी १९६, ओम अभय औटी १९४, सिद्धेश समीर अंबे १८८, अपूर्वा जालिंदर गाडेकर १८२, सेजल राजेंद्र औटी १८२, स्वराली विनायक कोल्हे १८२असे एकूण१० विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत येऊन शाळेच्या यशात एक वेगळा ठसा उमटविला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विषय शिक्षक शेकडे सर,मोढवे सर, रंधवे सर , मापारी सर,भालेकर सर,काकडे सर, नांगरे सर ,जाधव सर,यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांचे गुरुवर्य इंद्रभानजी डांगे, पद्मभूषण आण्णासाहेब हजारे, संस्थेच्या अध्यक्षा सविता म्हस्के, संस्थेचे संस्थापक गिताराम म्हस्के तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

from https://ift.tt/3qVTxsA

Leave a Comment

error: Content is protected !!