
पारनेर : तालुक्याला आगामी काळात वैचारिक दिशा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच राज्यात कोणतीही आघाडी होवो पारनेर तालुक्यात मात्र भाजप-शिवसेना युती अभेद्य राहणार असल्याचे सुचक विधान खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.दरम्यान खा.डॉ. सुजय विखे यांच्या व्यासपीठावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि सभापती उपस्थित असल्याने विखे यांच्या या विधानाला पुष्टी मिळत आहे.
तालुक्यातील दैठणे गुंजाळ ते जामगाव या रस्त्याचा रस्त्याचे भूमिपूजन समारंभ आज खासदार डॉ. विखे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे पाटील, सभापती गणेश शेळके, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे,राहुल पाटील शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत परंतु या प्रश्नांना बगल देऊन सूडबुद्धीचे राजकारण सुरू असल्याची खंत व्यक्त करतानाच महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला आहे असा सवालही खासदार विखे यांनी व्यक्त केला.
लोकप्रतिनिधी हा जनतेच्या सेवेसाठी असतो त्यांनी त्यांचे उत्पन्नाचे साधने निर्माण करावीत. जनतेच्या पैशावर सेवा होत नसते असे सांगत डॉ.विखे यांनी अप्रत्यक्षपणे आमदार निलेश लंके यांच्यावर टोला लगावला.
आमदार विजयराव औटी यांच्या काळात अनेक रस्त्यांची कामे मार्गी लागली असून त्या कामाचा दर्जा आजही टिकून आहे. आपण देखील आपल्या काळात करीत असलेला रस्त्यांची कामे ही दर्जेदार स्वरूपाची होत असल्याचे सांगताना आपण कोणत्याही ठेकेदाराकडून टक्केवारी घेत नाहीत. तो आमचा पिंडही नाही असेही विखे यांनी सांगितले.
पारनेर तालुक्याच्या राजकीय स्थितीबद्दल बोलताना डॉ.विखे म्हणाले की, राज्यात कोणतीही आघाडी होवो पारनेर तालुक्यात मात्र शिवसेना-भाजपची युती कायम असणार आहे. कारण माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत घटक पक्ष म्हणून शिवसेनेने फार मोठी मदत केली याची मला जाणीव आहे असे सांगत आजच या व्यासपीठावर 2-3 उमेदवार तयार असल्याचे खासदार विखे यांनी सांगितल्याने त्यांच्या युतीच्या विधानाला पुष्टी मिळाली.
यावेळी बोलताना सुजीत झावरे पाटील म्हणाले की, तालुक्याच्या मतदानात झालेली चुक आता जनतेच्या लक्षात आली असून विधानसभा निवडणुकीच्या काळात आपण चुकीचे मतदान केल्यास तालुक्याचा बिहार होऊ शकतो असे विधान केले होते याचा प्रत्यय आता येऊ लागला असून तालुक्यात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. रोजच अत्याचार आणि बलात्काराच्या घटना घडत आहे याचाही तपास लागत नसल्याची खंत सुजित झावरे यांनी व्यक्त केली.
दैठणे गुंजाळचे सरपंच पांडुरंग ऊर्फ बंटी गुंजाळ, उपसरपंच सचिन गुंजाळ, सारोळा अडवाईचे सरपंच परशुराम फंड, शिवाजी लावंड,सबाजी येवले, डॉ.संतोष गुंजाळ, भाऊसाहेब घोलप, शंकर महांडूळे आदी यावेळी उपस्थित होते. जयसिंग गुंजाळ यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
दैठणे गुंजाळ येथे काही वर्षापूर्वी सुजीत झावरे पाटील व निलेश लंके यांच्या उपस्थितीत वृद्धांना काठी वाटप करण्यात आले होते. त्यानंतरच तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला. याचा धागा पकडत दैठणे गुंजाळची काठी आपणास लागल्याचे सुजित झावरे यांनी सांगताच उपस्थितांनी मध्ये एकच हशा पिकला.
from Parner Darshan https://ift.tt/3bJD2bX