वाडेगव्हाण : पारनेर तालुका आदर्श शिक्षकांची खाण असून तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांमुळेच तालुक्यातील गुणवत्तेचा आलेख सातत्याने वाढत असलेला दिसून येतो. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केले.
नारायणगव्हाण शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती बेबीताई तोडमल यांचा कार्यगौरव व सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात उपक्रमशील, पदवीधर शिक्षिका श्रीमती तोडमल यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील प्रामाणिक सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सभापती दाते बोलत होते.
पुढे बोलताना,सभापती काशिनाथ दाते म्हणाले की, जिल्ह्याच्या आदर्श शिक्षकांच्या यादीमध्ये पारनेर तालुक्यातील शिक्षक संख्येने जास्त आहेत. यावरूनच पारनेर तालुका आदर्श शिक्षकांची खाण असल्याचे सिध्द होते असे सांगून श्रीमती तोडमल यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
यावेळी पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांनी मला घरातूनच आईच्या रूपाने प्राथमिक शिक्षणाचा वारसा असल्याने या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या गुरूजनांविषयी कायमच आदर असल्याच्या भावना व्यक्त केल्या. गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी नारायणगव्हाण शाळा शिक्षकांच्या सामुहिक प्रयत्नामुळे तालुक्यातील अग्रेसर शाळा म्हणून ओळखली जाते असे सांगितले.
कार्यक्रमात खरेदी-विक्री संघाचे संचालक गणेश शेळके, तालुका भाजपाचे उपाध्यक्ष काशिनाथ नवले, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष व शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, राजेंद्र शिंदे,प्रवीण ठुबे यांनी मनोगत व्यक्त केले.
शाळेचे मुख्याध्यापक चांगदेव गवळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख बाळकृष्ण खोसे होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष गोकुळ कळमकर व गणेश कोहोकडे यांनी केले. तर आभार श्री. संजय रासकर यांनी मानले.
कार्यक्रमास शिक्षक संघाचे राज्य प्रतिनिधी आबासाहेब दळवी, शिक्षक बँकेचे संचालक संतोष दुसूंगे, संचालक सुयोग पवार, सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत, शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत काळे, शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष नवनाथ तोडमल,प्रतिभा साठे, जेऊरच्या सरपंच राजश्री मगर,माजी सरपंच मधुकर मगर, मुख्याध्यापक दिनकर सोमवंशी, रवींद्र पिंपळे, महेश धामणे, भास्कर कराळे, बाबा आव्हाड, बाळासाहेब मोरे, चंद्रकांत मोढवे, नंदकिशोर रहाणे, बाळासाहेब फटांगडे, अजित चहाळ, अनिल जाधव, विजय बनकर, आदर्श शिक्षक तुकाराम अडसूळ, राजेंद्र पोटे व इतर शिक्षक, नातेवाईक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी शाळेस भेट देत श्रीमती बेबीताई तोडमल यांचा सेवापूर्ती निमित्ताने सन्मान करून शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले.

from https://ift.tt/3p1fDc2

By News

Leave a Reply

Your email address will not be published.