पारनेर :”पवार साहेब, आम्हाला पाणी द्या पाणी, पाण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे” असे सांगत विधानसभा निवडणूकीत सिंचनाच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याचा नारा देणाऱ्या आ. निलेश लंके यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. तालुक्यातील १२७ गावतलाव व पाझरतलाव दुरूस्तीसाठी तब्बल २४ कोटी ५३ लाख ६ हजार रूपयांचा निधी मंजुर झाला आहे. अजूनही काही तलावांच्या दुरूस्तीसाठी लवकरच निधी मंजुर होणार असून तलाव दुरूस्तीसाठी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठया प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. नगर जिल्हयात मंजुर निधीमध्ये पारनेर तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. 
विधानसभा निवडणूकीत पाण्याचा नारा देणाऱ्या आमदार निलेश लंके यांनी निवडणूकीनंतर महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. कुकडी प्रकल्पातील तालुक्याचे हक्काचे पाणी देण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हा प्रश्‍न मार्गी लावण्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली आहे. तर राळेगणसिध्दीसह इतर गावांच्या पाणीयोजनेचा प्रस्तावही मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. वडझिरे येथील शिवडोहच्या लिंककालव्यास मंजुरी मिळाली असून हे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. पावसाचे पाणी विविध तलावांमध्ये आडविण्यात आल्यानंतर गळतीमुळे हे पाणी वाहून जात होते. तलाव दुरुस्तीसाठी आ. लंके यांनी शासनदरबारी प्रस्ताव सादर केले होते. त्यांना निधी मंजूर झाला असून आता सर्व पाझर तलावांची दुरूस्ती होणार असल्याने लवकरच सिंचनाचा वाढलेला टक्का दृष्टीक्षेपात येणार आहे.
📌 विविध तलावांना मंजुर निधी पुढीलप्रमाणे :
कर्जुले हर्या (सतीचा ओहळ ५० लक्ष), पिंपरीपठार (नं. १ २७ लक्ष), शेरीकोेलदरा (५० लक्ष), हिवरे कोरडा (पिराचादरा ४४ लक्ष), जामगांव (सोबले वस्ती ३४.३० लक्ष) , गोरेगांव (भुडकी नाला ४६.५६ लक्ष), वडगांव दर्या (नं. १ गावठाण १७.२५ लक्ष), अक्कलवाडी (१६.६३ लक्ष), पारनेर (बुगेवाडी १७.५९ लक्ष), कडूस (नागझरी १९.१४ लक्ष),कडूस (पिंपळओढा २०.५४ लक्ष), कडूस (सातकणी ३०.६२ लक्ष), कान्हूरपठार (भांबेदरा १८.८२ लक्ष), कान्हूरपठार (ससेखोरी २१.६६ लक्ष), करंदी (मळई २३.८१ लक्ष), खडकवाडी (बोरवाक ११.०६ लक्ष), खडकवाडी (जांभूळदरा २५.८४ लक्ष), किन्ही (खटकळी १९.७१ लक्ष), किन्ही (सोनआंबी १४.४१ लक्ष), निवडूंगेवाडी (पानधुती मळा १०.९९ लक्ष), निवडूंगेवाडी (थोपटेवस्ती १२.७५ लक्ष)
पळशी (खांबळी ४५.४७ लक्ष), पुणेवाडी (बागलनाला २३.४७), पुणेवाडी (देऊळढेपा २१.७९ लक्ष), रायतळे (उमराचा तलाव १८.८६ लक्ष), रायतळे (वाकणतलाव २४.१० लक्ष), रांधे (चोरदरा ३७.१२ लक्ष), भोंद्रे (गाढवदरा ९.०८ लक्ष), धोत्रे बुद्रुक (धनगरदरा २३.६८ लक्ष), धोत्रे बुद्रुक (मंचरदरा नं १ २६.८५ लक्ष), धोत्रे बुद्रुक (मंचरदरा नं. २ ३३.७१ लक्ष), हंगे (पिंपळओढा ४६.६५ लक्ष), हिवरेकोरडा (जनीचामळा २६.४० लक्ष), किन्ही (बहिरोबावाडी २६.४८ लक्ष), पळसपूर (ढगेवाडी जुलूमखोरा ३७ लक्ष), सुपे (येणारेवाडी ३४.१० लक्ष), टाकळीढोकेश्‍वर (धुमाळवस्ती २६.७० लक्ष), वडनेरहवेली (कर्डीलेमळा २७.४८ लक्ष), पानोली (नं. १ ३४.०९ लक्ष), गोरेगांव (नं. ४ चांभारमळी ३५.५५ लक्ष), पानोली (नं. २ ३६.१८ लक्ष), पुणेवाडी (गणेशखिंड १३.७१ लक्ष), गोरेगांव (नं. २ ब्राम्हणदरा २५.५४ लक्ष), वडगांवदर्या (नं. २ १५.४५ लक्ष), हंगे (मोकातेवस्ती १९.५८ लक्ष), पुणेवाडी (मोगलदरा १५.५६ लक्ष), गोरेगांव (नं. ५ मुंगळकडा २५.९५ लक्ष)
मुंगशी (करपे मळा १२.५५ लक्ष), भोंद्र (गावठाण २०.२३ लक्ष), ढवळपूरी (भोंडवेवस्ती २४.०५ लक्ष), कासारे (गावदरा (क्र. १ ३१.२६ लक्ष), वडगांवसाताळ (खामकर झाप ३६.२१ लक्ष), वनकुटे (गाडीओढ १९.७९ लक्ष), किन्ही (बहिरोबावाडी हकडी २१.०७ लक्ष), पिंपळगांतुर्क (कन्हेरओहळ २८.३७ लक्ष), वेसदरे (ब्राम्हणदरा ३५.०९ लक्ष), वासुंदे (४०.५५ लक्ष), वडगांवसावताळ (लिंगओहळ ३२.८६ लक्ष), नांदूरपठार (मोरदरा २७.७१ लक्ष, टाकळीढोकेश्‍वर (निवडूंगेवाडी झावरदरा १७.१८ लक्ष), कर्जुलेहर्या (गावतलाव १३.५८ लक्ष), अक्कलवाडी (गावठाण क्र. २ ११.८८ लक्ष), पुणेवाडी (गणेशखिंड १९.६७ लक्ष), काळकूप (साठाबंधारा मतेवस्ती १२.६७ लक्ष), कान्हूरपठार (साठाबंधारा ११.९१ लक्ष), भोंद्रे (झावरे वस्ती २५.२४ लक्ष), पळशी (गागरेफार्म ७.०३ लक्ष), राळेगणथेरपाळ (साठाबंधारा हरिजनवस्ती १०.८७ लक्ष)
निघोज (शिरसुले क्र. १ १८.७३ लक्ष), निघोज (शिरसुले क्र. २ १९.२० लक्ष), वडझिरे (साठाबंधारा शेंडेश्‍वरमंदीर ५.७१ लक्ष), वडझिरे (साठाबंधारा सपकाळ मळा ४.२९ लक्ष), वडझिरे (साठाबंधारा मोरेमळा ४.७ लक्ष), सिध्देश्‍ववाडी (पानोली शिव १९.८६ लक्ष), कान्हूरपठार (साठाबंधारा सांडीचा ओढा ५.५९ लक्ष), कान्हूरपठार (साठाबंधारा फुलबाग ३.३० लक्ष), पिंपळगांवतुर्क (साठाबंधारा कुरण २४.२४ लक्ष), कान्हूरपठार (साठाबंधारा हरिजनवस्ती खडकडोह ५.३६ लक्ष), पळवे बुद्रुक (पान्हाचा पाणीपुरवठा विहिरीजवळ १८.३९ लक्ष), पळवेबुद्रुक (साठाबंधारा स्मशानभुमीजवळ ४.०८ लक्ष), कडूस (साठाबंधारा जेवरकी १७.०६ लक्ष), कडूस (पिंपळाचा ओढा १७.०७ लक्ष), वडनेरहवेली (साठाबंधारा दत्तमंदीर ४.३७ लक्ष), वडनेरहवेली (साठाबंधारा शिवकालीन राउतवस्ती ४.९२ लक्ष), गटेवाडी (साठाबंधारा पवारवस्ती ४.३३ लक्ष), गटेवाडी (साठाबंधारा मोरदरा २.७८ लक्ष), गटेवाडी (साठाबंधारा जांभळीचा मळा ४.६९ लक्ष), जातेगांव (साठाबंधारा स्मशानभुमीजवळ ४.९३ लक्ष), जातेगांव (साठाबंधारा जातेगांव भैरवनाथ मंदीर ८.६७ लक्ष), पळसपूर (टाक्याचा तलाव ढगेवाडी १९.२९ लक्ष), वडनेरहवेली (कर्डीले मळा ३५.९९ लक्ष), दरोडी (साठाबंधारा खडकवाडी ३.३७ लक्ष), दरोडी (साठाबंधारा गंजीभटटी २.९३ लक्ष), वासुंदे (गावतलाव झडगुलेवस्ती ७.०३ लक्ष), गटेवाडी (गावतलाव स्मशानभुमीजवळ ७.२६ लक्ष), गांजीभोयरे (गागरेवस्ती १६.५२ लक्ष), टाकळीढोकेश्‍वर (गावतलाव पायमोडेवस्ती ११.८२ लक्ष), टाकळीढोकेश्‍वर (गावतलाव खिलारपठार जाधवदरा ४१.६६ लक्ष), दैठणेगुंजाळ (साठाबंधारा लेंडीनदी ४.९७ लक्ष), दैठणेगुंजाळ (साठाबंधारा डोंगरवस्ती ६.०१ लक्ष), वडगांवआमली (साठाबंधारा १० वा मैल ९.७५ लक्ष), भाळवणी (साठाबंधारा आमलेवस्ती ९.९६ लक्ष), भाळवणी (गावतलाव कापरी हॉटेलजवळ १४.९७ लक्ष), भोंद्र (साठाबंधारा खिरमळा ६.३२ लक्ष), खडकवाडी (साठाबंधारा १०.०३ लक्ष), घाणेगाव (गावतलाव ६.९९ लक्ष), घाणेगाव (साठाबंधारा स्मशानभुमीजवळ ८.२८ लक्ष), हिरवेकोरडा (२६.९९ लक्ष), मुंगशी (गावतलाव थोरात वस्ती ३०.९६ लक्ष), करंदी (गावतलाव स्मशानभुमीजवळ ९.२४ लक्ष), कळस (साठाबंधारा चौफुला ४.१३ लक्ष), कळस (क्र. १ २७.८२ लक्ष), पळवेबुद्रुक (साठाबंधारा कोल्होबाचा ओढा ४.४९ लक्ष), पिंपळगांतुर्क (गावठाण साठाबंधारा ६.१९ लक्ष), कर्जुलेहर्या (पाचेआंबा २४.३६ लक्ष), पोखरी (पारदरा २०.८४ लक्ष), पळशी (साठाबंधारा बागमळा १०.१७ लक्ष), कर्जुलेहर्या (सतीचा ओहळ २८.४० लक्ष), करंदी (कडानी मळी १७.५२ लक्ष), हिवरेकोरडा (साठाबंधारा डुक्करदरा ९.३३ लक्ष), पळवेखुर्द (स्मशानभुमी साठाबंधारा ८.४४ लक्ष), पळवेबुद्रुक (साठाबंधारा गावठाण ३.५२ लक्ष), करंदी (कडानी ५.६५ लक्ष), गारगुंडी (साठाबंधारा निरगुड ६.०१ लक्ष), अळकुटी (साठाबंधारा शिंदे पंदारे वस्ती १०.१० लक्ष), सावरगांव (चिकणेवाडी नं १ साठाबंधारा ४९.७६ लक्ष), वारणवाडी (खरकडी १५.१९ लक्ष).
नगर तालुका
हिवरेझरे (काळेवाडी ३७.२१ लक्ष, हिवरेझरे (२५.१७ लक्ष), निमगांव वाघा (क्र. १ 44.30 लक्ष).

from https://ift.tt/3nii6Pj

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *