समाजात आपण अनेक अनिष्ठ चालीरिती पहातो.त्यावर संधी मिळाल्यावर आपण बोलतोही.पण पण अशाने परिवर्तन घडवून आणता येईल का?तर मुळीच नाही.दोष दाखवण्याची ती एक संधी मिळवली इतकच त्याचं स्थान असेल.कारण त्यातुन काही सुधारणा झालीय का?हे पहाण्याची तसदी त्यात नसतेच.समाजसुधारक होणं गप्पा मारण्याइतकं सोपं नाही.
पोट भरण्यासाठी जगणाराला ते शक्यही नाही. इतिहास नेहमी वेडी माणसं घडवणात असं आपण नेहमी म्हणतो.ती माणसं जर वेडी असतील तर इतिहास घडेल का?वेडात दौडले वीर मराठी सात.हे सात कोण होते?त्यांना कोणते वेड लागले होते?त्यांना प्रपंच नव्हता का?हा इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे. शिवाजी जन्माला यावा पण दुसऱ्याच्या घरात.ही म्हण कशी तयार झाली असेल?स्वार्थ वृत्ती हे त्याचं उत्तर आहे.कारण शिवाजी ते शिवछत्रपती हा इतिहास धगधगता विस्तव आहे. एवढं दिव्य आपल्याला जमणार नाहीच.नुसत्या नावासाठी जीव देण्याची तयारी होणं म्हणजे त्या विषयाचं वेड लागणं आहे.
छत्रपती नावाचं गारुड असच आहे. एकीकडे स्वराज्य सांभाळताना शत्रुसाठी कर्दनकाळ आणि दुसरीकडे कौटुंबिक नात्यांना कसा न्याय द्यावा?हे कौटुंबिक व्यवस्थापन आणि माणसांवर किती प्रेम करावं? हे शिवरायांकडुन शिकण्यासारखं आहे.
आम्हाला एवढी दिव्य करायला जमणार नाही हे जरी खरं असलं तरी काही अंशी तरी आम्ही जगण्याची पद्धत बदलु शकतो.आदर भावना हा त्याचा पाया आहे. त्याची सुरुवात कशी करावी?यावरच आपण पुढील भागात चिंतन करणार आहोत.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/g0S1eJl

By News

Leave a Reply

Your email address will not be published.