पारनेर : ग्रामीण भागातील होतकरू व हुशार तरुणांना परदेशामध्ये संशोधनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत असे मत डॉ. संतोष पागिरे यांनी रसायनशास्त्र विभागामध्ये आयोजित माजी विद्यार्थी मार्गदर्शन व्याख्यानामध्ये व्यक्त केले.
पारनेर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामध्ये ” रिसर्च करियर इन केमिस्ट्री :अपॉर्च्युनिटी अब्रोड” या विषयाचे व्याख्यान तृतीय वर्ष व पदव्युत्तर रसायनशास्त्र विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक व पारनेर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. संतोष पागिरे यांना आमंत्रित करण्यात आले होते.
डॉ. संतोष पागिरे हे सध्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल यु.के. या ठिकाणी कार्यरत आहेत.डॉ. संतोष पागिरे यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मेरी क्युरी पोस्ट डॉक्टरल शिष्यवृत्ती प्राप्त असून यापूर्वी त्यांना डी. एफ. जी., डॅड, सी. एस. आय. आर.,या नामांकित शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या होत्या.डॉ. संतोष पागिरे यांची पीएच्.डी जपान येथून पूर्ण केली असून पुढील संशोधन सध्या ब्रिस्टॉल युके या ठिकाणी करत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळावा या हेतूने विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.
“विद्यार्थ्यांनी जीवनात छोटी ध्येय साध्य करत जावे व यशस्वी वाटचाल करावी” असे डॉ. संतोष पागिरे यांनी सांगितले. तसेच या व्याख्यानामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना विविध देशांतील संशोधनासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती विषयी सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले,माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या गौरवामध्ये भर घालीत असून महाविद्यालयास नेहमी सहकार्य करतात. तसेच रसायनशास्त्र विभाग विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याबद्दल कौतुकही केले.
उपप्राचार्य व विभागप्रमुख डॉ. दिलीप ठुबे यांनी डॉ. संतोष पागिरे यांचा शैक्षणिक प्रवास व कठीण परिश्रमाची जाणीव सर्व विद्यार्थ्यांना करून दिली.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. सागर म्हस्के यांनी काम पाहिले.प्रा.भाऊसाहेब नरसाळे यांनी डॉ.संतोष पागिरे यांची ओळख करून दिली व व प्रा. स्वाती चौधरी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. तुकाराम थोपटे, डॉ. राहुल डिग्गीकर,डॉ. संभाजी काळे, प्रा. अनिल ढोले, प्रा. प्रवीण दौले, प्रा. नवनाथ चेडे, डॉ.सरिता कुंडलिकर,प्रा.अश्विनी ठुबे,प्रा. वर्षा मगर प्रा. माधुरी तारडे व इतर सहकारी उपस्थित होते.

from https://ift.tt/3qiTpUC

By News

Leave a Reply

Your email address will not be published.