
रणनीतिकार, महान अर्थशास्त्रज्ञ आणि बुद्धिमत्तेने समृद्ध म्हणून आचार्य चाणक्य खूप प्रसिद्ध आहेत. त्यांना समाजाची सखोल जाण होती, म्हणून त्यांनी एक धोरण तयार केले. यामध्ये लोकांना आनंदी, यशस्वी आणि प्रतिष्ठित जीवन कसे जगावे? याबाबत सांगितले आहे. दरम्यान चाणक्यजींनी त्यांच्या नीतिशास्त्रात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या व्यक्तीने आपल्या मुलांसमोर आणि पत्नीसमोर कधीही बोलून दाखवू नयेत. त्यावर एक नजर टाकूयात..
● पत्नी-मुलांसमोर शब्दांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करा. कारण तुम्ही तुमच्या मुलांसमोर जसे वागाल तसेच ते तुमच्यासमोर वागतील.
● आपण जे काही बोलतो किंवा कोणतीही क्रिया करतो. मुलं देखील तेच करू लागतात. म्हणूनच आपण मुलांसमोर अयोग्य भाषा वापरू नये तसेच पत्नीसोबत कधीही अपशब्द वापरू नका.
● मुलांसमोर किंवा पत्नीसमोर अशा गोष्टी कधीही करू नका, ज्यामुळे त्यांचा त्रास होईल. कारण टोचून बोलल्याने आणि एखादे वाक्य तेच धरून बसल्याने मुलांचा आणि पत्नीचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे घरात भांडण होतात.
● तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवायचे असेल तर स्वतः शिस्त पाळा. तरच तुमची पत्नी आणि मुलं शिस्त पाळतील.
● कुटुंबाशी नम्रतेने बोलले पाहिजे आणि रागापासून दूर राहा. यामुळे घरात सुख-समृद्धी राहते.
from https://ift.tt/qrnNW1a