पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा अडकून पडल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयीच्या चर्चेला उधाण आले होते. सदर घटना म्हणजे सुरक्षेतील गंभीर चूक मानली जात आहे. दरम्यान पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था कशी असते? या संदर्भात या लेखामध्ये जाणून घेऊयात… 
पंतप्रधान कोणत्याही दौऱ्यावर जाणार असतील तर केंद्रीय गृहमंत्रालय दौऱ्यापूर्वीच संबंधित राज्यांना ब्ल्यू बुकलेट पाठविते. त्यानुसार सुरक्षेची फुलप्रुफ व्यवस्था केली जाते. दौऱ्यापूर्वी किमान 15दिवस अगोदर राज्य सरकार, संबंधित अधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासन आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) एकत्रित पणे सुरक्षा व्यवस्थेची आखणी करत असते.

स्थानिक प्रशासन प्रथम मार्ग, पर्यायी मार्ग ठरविते आणि एसपीजी त्याला अंतिम स्वरूप देत असते. पंतप्रधान ज्या मार्गावरून जाणार त्या ठिकाणी 7 तास अगोदर सुरक्षा प्रात्यक्षिक घेतले जाते. कधी-कधी काही तास अगोदर मार्ग बदलला जातो.
पंतप्रधान ताफ्यापासून 50 ते 100 मीटर अंतरावर स्थानिक पोलीस, गुप्तचर असतात. जे प्रत्येक क्षणाची माहिती कंट्रोल रूमला देतात. एसपीजी त्वरित त्यानुसार निर्णय घेत असतात. अगदी ऐनवेळी मार्ग बदलण्याची वेळ आलीच तर पूर्वी जे पर्यायी मार्ग ठरविलेले असतात त्यातील एक मार्ग निवडला जातो. ताफा कुठे पर्यंत पोहोचला? याची माहिती वेळोवेळी कंट्रोल रूमकडे दिली जाते. सर्वात पुढे पायलट कार असते. जी पुढचा रस्ता निर्धोक असल्याचे संदेश देत असते.
पंतप्रधानांच्या आजूबाजूला एसपीजीचा घेरा असतो. दरम्यान वाहनातील कमांडो अतिशय सतर्क असतात. ताफ्यात अनेक प्रकारची वाहने असतात. जसे की पायलट कार, टेक्निकल कार, व्हीव्हीआयपी कार, जॅमर वाहन, अँब्ल्यूलंस. या ताफ्यात किमान 5 वाहने असतात. पहिली पायलट, दुसरी एस्कॉर्ट, मग पंतप्रधान कार, पुन्हा एस्कॉर्ट आणि एक स्पेअर कार. एसपीजी नेहमीच पंतप्रधानांना आपल्या गरड्यात ठेवत असतात. तसेच आणीबाणी आल्यास त्याची योजना देखील तयार असते.

from https://ift.tt/3JPdr0N

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *