निवडणूकीच्या निकालाधीच काळाचा घाला!

Table of Contents

नाशिक : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणामधील ही घटना आहे. पंकज पवार असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. पंकजसह आणखी एकाचा अपघाती मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव दुचाकी झाडाला आदळून हा अपघात झाला. या अपघातामध्ये पंकज पवार यांच्यासह एक जणाचा मृत्यू झाला आहे तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी गर्दी केली. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जखमीवर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पंकज याने सुरगाणा नगरपंचायतची निवडणूक लढवली होती. मात्र निकाल येण्याआधीच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.

दोघांचा मृत्यू एक जखमी
घटनेबाबत अधिक माहिती अशी की सुरगाना नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवार पंकज पवार हे अन्य दोघांसोबत दुचाकीवरून चालले होते. मात्र दुचाकीस्वाराचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव दुचाकी झाडाला धडकली. या घटनेत पंकज यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. पंकज यांच्यासोबत अन्य एका व्यक्तीचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

निवडणूक निकाला आधीच मृत्यू
पंकज पवार यांनी सुरगाणा नगरपंचायतीच्या प्रभाग 12 मधून निवडणूक लढवली होती. 19 जानेवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र निकाल लागण्यापूर्वीच पंकज पवार यांच्यावर काळाने घाला घातला. दुचाकी अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पवार यांच्या मृत्यूमुळे शहरातून हळहळ व्यक्त होत आहे.

from https://ift.tt/3txPHsy

Leave a Comment

error: Content is protected !!