
अहमदनगर : निवडणूकीच्या वादातून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या कुरुंद (ता. पारनेर) येथील अमोल भाऊसाहेब कर्डीले (वय 33 वर्षे) याच्या विरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत पारनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल होवून त्याला दि. 28 जानेवारी 2021 रोजी अटक झालेली होती. श्री. कर्डीले यांनी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर व केस सेशन कमेट झाल्यानंतर नगर जिल्हा न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. सदरचा जामिनचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम. आर. नातु यांनी रोजी फेटाळला आहे. या प्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील सी. डी. कुलकर्णी, अॅड. सुरेश लगड व अॅड. अजिंक्य काळे यांनी काम पाहिले.
याबाबतची सविस्तर हकीगत अशी की, कुरूंद, (ता. पारनेर) येथील जयवंत मंजाबा नरवडे (फिर्यादी) वय 55 वर्षे व आरोपी नं. 1 अनिल दशरथ कर्डीले, रा. कुरुंद, ता. पारनेर हे ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद उभे राहिले होते. त्यामध्ये फिर्यादी जयवंत नरवडे हे पराभूत झाल्याने, अनिल दशरथ कर्डीले, अमोल भाऊसाहेब कर्डीले, सागर भाऊसाहेब कर्डीले, विवेक उर्फ पिंट्या अरुण कर्डीले, अविनाश निलेश कर्डीले, राजु दत्तु शेळके, राजेंद्र साहेबराव कर्डीले, पंकज अनिल कर्डीले, सुहास गोरख थोरात, आकाश निलेश कर्डीले व रमेश महादु नरवडे (सर्व रा. कुरूंद, ता. पारनेर) या आरोपींनी यातील आरोपी क्र. 11 रमेश महादु नरवडे याने दिलेल्या माहितीवरून दि. 19/01/2021 रोजी दुपारी 3.30 वा. आरोपींनी गैरकायदयाची मंडळी जमवून कार व मोटार सायकलने फिर्यादीचे शेतात नरवडे वस्ती येथे जाऊन यातील फिर्यादी हे त्यांचे कांदयाचे पिकाला खत टाकत असताना “तू आमचे विरोधात निवडणुकीत उभा राहातो काय?” असे कारण काढून फिर्यादीस तलवारीने व काठ्याने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेतील साक्षीदार हे सोडविण्यास आले असता यातील आरोपी क्र. 5 अविनाश निलेश कर्डीले याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला म्हणून आरोपींविरूध्द गुन्हा दाखल होऊन आरोपपत्र देखील पारनेर न्यायालयात दाखल होऊन सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे कमेट झाल्याने त्या ठिकाणी सदरचे आरोपीने जामिन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. उभय बाजुंचा युक्तीवाद ऐकुन घेऊन न्यायालयाने जामिन फेटाळला आहे. “आरोपीस जामिन मंजुर झाल्यास फिर्यादी व साक्षीदाराचे जीवास धोका उत्पन्न होईल व आरोपी विरुद्ध अनेक गुन्हे प्रलंबित आहे” असा युक्तीवाद सरकारपक्षातर्फे (फिर्यादीपक्षातर्फे)करण्यात आला, तो युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजुर केला.
या प्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील सी. डी. कुलकर्णी, अॅड. सुरेश लगड व अॅड. अजिंक्य काळे यांनी काम पाहिले.
from https://ift.tt/33jNupz