मुंंबई : प्रतिनिधी
असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी मुुंबईतील निलेश लंके महिला प्रतिष्ठाण सरसावले असून या कामगारांची राष्ट्रीय डेटा बेस नोंदणीच्या कार्यक्रमाला आजपासून सुरूवात झाली आहे. आ. निलेश लंके प्रतिष्ठानच्या मुंबईचे अध्यक्ष सुरेशशेठ धुरपते यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यामुळे असंघटीत कामगारांना ई – श्रम योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.
राज्यात सुमारे 55 लाख असंघटीत कामगारांची संख्या आहे. त्यामध्ये मुंबई शहरात सर्वाधिक कामगारांची संख्या आहे. त्यामध्ये पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील असंघटीत कामगारांची संख्या मोठी आहे. त्यांना संघटीत करून त्यांची राष्ट्रीय डेटाबेस नोंदणी करून त्यांना राज्य सरकारचे हक्काचे फायदे मिळवून देण्यासाठी महिला प्रतिष्ठाणने पुढाकार घेतला आहे. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष सुरेशशेठ धुरपते यांच्या हस्ते शुभारंभ झालेल्या उपक्रमाप्रसंगी महिला प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा निर्मलाताई लटांबळे, सचिव नितिन चिकणे, ठाणे जिल्हाध्यक्षा स्वाती लंके, ऐश्‍वर्या धुरपते, सुनिता हुले, अश्‍विनी मोरे, मनिषा पाटील, जयश्री थोरात, नंदीनी पाटील, जुईली पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
असंघटीत कामगारांना या श्रमिक कार्डच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना, रोजगाराच्या संधी, विमा, मासिक वेतन तसेच शासनाच्या विचाराधीन असलेल्या अनेक योजनांचा लाभ होणार आहे. या योजनेचा सर्व असंघटीत कामगारांनी लाभ घेण्याचे आवाहन उद्योजक सुरेशशेठ धुरपते, महिला अध्यक्षा निर्मला लटांबळे यांनी केले आहे.
▪नोंदणी करण्याचे फायदे
ई-श्रम पोर्टलमध्ये सामील होणाऱ्या कामगारांना पीएम सुरक्षा विमा योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचा विमा देखील मिळतो. विशेष म्हणजे विम्यासाठी प्रीमियम भरण्याची गरज नाही. याअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख आणि अंशतः अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. तसेच विविध प्रकारचे सामाजिक सुरक्षा लाभही ई-श्रमद्वारे वितरित केले जातील.
▪आवश्यक कागदपत्रे
– आधार क्रमांक
– आधारशी लिंक केलेला मोबाइल क्रमांक
▪अशी करा पडताळणी.
जर एखाद्या कामगाराकडे आधार लिंक केलेला मोबाईल नंबर नसेल, तर सदर कामगार व्यक्ती जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे नोंदणी करू शकते. तसेच तुम्ही थेट हेल्पडेस्क नंबरवर कॉल करू शकता. तुमच्या क्रेडेन्शियलची पडताळणी केल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक ई-श्रम पोर्टलवर अपडेट केला जाईल. किंवा मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी तुम्ही ई-श्रम पोर्टल किंवा जवळच्या सीएससी केंद्राला देखील भेट देऊ शकता.

from https://ift.tt/3IsN4fA

By News

Leave a Reply

Your email address will not be published.