
निघोज : येथील अलमगीर हक हुसैन (वय २२) राहणार पश्चिम बंगालच्या परप्रांतीय ज्युस सेंटर चालवणाऱ्या दुकान चालकाकडून महिन्याला पंधरा हजार रुपये प्रमाणे खंडणी वसूल केल्या प्रकरणी पारनेर पोलिसांनी तेथील तथाकथित सामाजिक कार्यकर्ता व पैलवान म्हणून परिसरात ओळख असणाऱ्या सुभाष वराळ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आलमगीर हुसैन यांनी गेल्या चार वर्षांपासून निघोज येथे बसस्थानकावर फेमस ज्युस सेंटर चालु केले आहे.तेव्हापासून निघोज येथील स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या काही तरुणांनी हुसैन याला दुकान चालवायचे असेल तर महिन्याला पंधरा हजार रुपये हप्ता द्यावा चालू केला होता.तेव्हापासून आज पर्यत सतत हप्ता देवून त्रासलेल्या हुसैन यांना लॉकडाऊन व थंडीमुळे ज्युसचा धंदा कमी झाला होता.गेल्या महीन्याचा हप्ता घरातील ईन्व्हरर्टर विकुन त्याने दिला होता.
या महीन्याचा हप्ता मागण्यासाठी निघोज येथील सुभाष वराळ तेथे आला व म्हणाला या महिन्याचा हप्ता लेट का झाला ? लगेच दे नाही तर दुकान बंद कर व निघोज मधुन निघुन जा नाहीतर तुला जिवे ठार मारीन … ! तु अजुन मला ओळखले नाही.
या घटनेनंतर काहीतरी दिलासा मिळावा म्हणून हुसैन यांनी संदिप वराळ जनसेवा मंडळाचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ यांना भेटुन सुभाष वराळ याला यावेळेचा हप्ता माफ करण्याची मागणी केली. त्यानंतर सचिन वराळ यांनी सुभाषला फोन करून हप्ता माफ करण्यासाठी साकडे घातले . तेव्हा सुभाष म्हणाला मी निघोजचा डॉन असून त्याने मला कबूल केलेला हप्ता वेळेवर दिलाच पाहिजे,त्यानंतर सचिन वराळ यांनी हुसैन यांना याकामी मदत करण्याला असमर्थता दर्शवली व म्हणाले जे तुमचे ठरले त्याच प्रमाणे करा . पुन्हा तु माझ्याकडे येवू नको.त्यानंतर पुन्हा सुभाष वराळ याने तु माझी तक्रार सचिन भाऊकडे तक्रार करतो ,आता तुला सोडत नाही म्हणत पुन्हा फोनवर धमकावले.
आजपर्यत सुभाष वराळ याने १ लाख ऐंशी हजार रुपये खंडणी माझ्याकडून वसूल केली आहे . त्यानंतर असह्य झालेल्या हुसैन यांनी अखेर पारनेर पोलिस ठाण्यात सुभाष वराळ याच्या विरुद्ध खंडणी मागणे,वसुली करणे व त्यासाठी जिवे मारण्याची धमकी देणे अशी फिर्याद दाखल केली आहे.याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक घनशाम बळप करत आहेत.
from https://ift.tt/3paQnQJ