ना राजकीय वारसा… ना घराणेशाही..!

Table of Contents

पारनेर : राजकारणाचा कुठलाही वारसा नसतांना, एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असामान्य,अद्वितीय आणि सतत सामाजिक बांधिलकी जपण्याचे बाळकडू अगदी लहानपणापासून मिळालेले सरळ,साधं, आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणजे अमोल भाऊ साळवे,यांचा आज वाढदिवस !

शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करत,एकीकडे शैक्षणिक वारसा जपत, मुलांची सर्वांगीण जडणघडण करत,तितक्याच तन्मयतेने टाकळी ढोकेश्वर गणातून लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, सोबतीला विविध विकास कामातून फक्त स्वतःच्या गटा पुरत मर्यादित न राहता,गरजवंत कुठल्याही का असेना,त्याला शक्य तितकी मदत करण्याचं कार्य गेल्या कित्येक दिवसापासून सौ.सुप्रियाताई अमोल साळवे,यांच्या पंचायत समिती फंड,असेल किंवा इतर शासकीय योजनमधून समाजासाठी सतत कार्यरत असणार हरहुन्नरी नेतृत्व आज पारनेर तालुक्याच्या राजकीय पटावर अमोल भाऊ च्या रूपांत वावरताना दिसतंय.

वाऱ्याचा गुणधर्म वाहन आहे,
पण त्या वाऱ्यात फक्त चंगल्या कामाचा सूनगंधाने,कीर्तीचा दरवळ आजूबाजूला निरंतर पसरावा असे हे नेतृत्व
मग कोविड काळात स्वतःच्या शाळेत,कोव्हिड सेंटर उभारून,सामान्य कुटुंबातील कोरोनाबधित व्यक्तीची काळजी घेणं असेल,निराधारांसाठी श्रावण बाळ योजनेचा लाभ,शिलाई मशीन वाटप,पथदिवे लावून अंधार घालवण्याचे काम असेल, किंवा बस थांबा सुशोभीकरण करणे असेल. शाळांना सॅनिटाइझर, मास्क वाटप असेलशाळेचे सुशोभीकरण करणे,बसण्याचे बाक देणे, विद्यार्थ्यांना वेळोवेली सहकार्य करणे अशी असंख्य कामे करत असतानाच, सोबत सामाजिक अस्मिता जपत,कार्यरत असणाऱ्या आमच्या कोहिनुर हिऱ्याचा आज जन्म दिवस.
अशाच सतत प्रवाही राहणाऱ्या आमच्या अमोल भाऊस वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

from https://ift.tt/3fe7sEU

Leave a Comment

error: Content is protected !!