
नगर : तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील गराडीवस्तीवर राहत असलेल्या कुटूंबांतील सुनेने सासऱ्याला कुऱ्हाडी व दगडाने मारून खून केला. कौटूंबिक वाद आणि चारित्र्याचा संशय घेतल्याने सुनने आपल्या सासऱ्याचा खून करण्याची घटना सोमवारी मध्य रात्री नंतर साडेबारा च्या सुमारास घडली.
यात मयत झालेत्या व्यक्तीचे नाव अर्जुन गोविंद हजारे (वय 62 रा. चिचोंडी पाटील) नाव आहे. हा खून मयत व्यक्तिच्या सून ज्योती अतुल हजारे (रा. चिंचोडी पाटील) हिने केला असून या प्रकरणी मयताच्या मेव्हूनीच्या मुलाने (भाचा) बाबासाहेब चंदु बनकर (वय 42 रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) फिर्याद दाखल केली असुन नगर तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत तालुका पोलिस ठाण्यातून मिळालेती माहिती अशी की अर्जुन हजारे यांचा मुलगा अतुल दोन वर्षापासून बेपत्ता असल्याने आपल्या सून आणि नातवा सोबत राहत होता . तो सून ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यावरून सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते दीड पर्यंत भांडण सुरु होते . गराडी वस्ती वरील भाऊ गुजाबा हजारे यांच्या घरासमोरील रस्त्यावर हे भांडण झाले होते. या भांडणामध्ये ज्योती हिने अर्जुन हजारे यांच्या डोक्यात, कपाळावर, तोंडावर दगड व कुऱ्हाडीने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन अर्जुन हजारे यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान पोलीस पाटील संतोष खराडे यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनला खबर दिली .पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून सकाळी सव्वा नऊ दरम्यान मृतदे शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे पाठवला.
नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, प्रकाश बोराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी ज्योती हजारे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे करीत आहे.
from https://ift.tt/3FGzRP3