पारनेर : नगरपंचायतीची निवडणुक नुकतीच झाली असून या नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत 27 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4 वा. प्रधानसचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे होणार आहे. यामुळे पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण काय हे आता गुरुवारी 27 जानेवारी 2022 रोजी समजणार आहे. यामुळे सगळयांचे लक्ष आरक्षण सोडतीवरती वेचून राहिले आहे.
पारनेर नगरपंचायतीची निवडणुकीबरोबरच राज्यातील 149 नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. मात्र या 139 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाचे आरक्षण सोडत झाली नव्हती. यामुळे या आरक्षणाची सोडत 27 जानेवारी 2022 रोजी दुपारी 4 वा. प्रधानसचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय मुंबई येथे होणार आहे. या लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले असून पारनेर नगरपंचायीचे आरक्षण सोडत काय पडणार याची उत्सुकता वाढली आहे.
कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी सोडतीसाठी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधींनी मंत्रालयात उपस्थित राहण्याऐवजी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित रहावे. सदर सोडतीसाठी ऑनलाईन उपस्थित राहण्यासाठी आपल्या कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरनसची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सोडतीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी व आपल्या विभागातील नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील 10 लोकप्रतिनिधींना ऑनलाईन पध्दतीने विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात यावे, अशा सूचना नगरविकास मंत्रालयाच्या उप सचिव प्रियंका कुलकर्णी -छापवाले यांनी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालकांना दिल्या आहेत.

from https://ift.tt/35ncf59

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *