गेल्या पंधरा विस दिवसांपासून आपण सहज ध्यान पध्दती शिकत आहोत.शुन्य होऊन बसण्याची कला मोठी अदभूत आहे. काही वेळ तरी ही अवस्था अनुभवायला हवी.काय करु नये,याचं उत्तम ज्ञान यामुळे प्राप्त होते.कर्मगती आणि त्यातुन भोग ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे.जगण्याच्या प्रक्रियेत मिळवणे हा भाव आपोआप तयार होतो.लहान मुलात सुद्धा स्वार्थबुद्धी निसर्गतःच तयार होते.त्यांना दुसऱ्याच्या हातातील वस्त पदार्थ हिसकावून घेण्याची प्रेरणा ही अंतस्थ तयार होते.
जगण्याची अन्न मिळवता आले पाहिजे त्यासाठी ती स्वार्थबुद्धी आवश्यक असते.कळते झाल्यावर ती हळूहळू लोप पावु लागते.मग मागुन घेण्याची सदबुद्धि येते.
ही बुद्धी कायम रहात नाही,हेच जीवन दुःखी होण्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे. अधिक समज निर्माण झाल्याने पुन्हा हिसकावून घेण्याची वृत्ती निर्माण होते.वास्तविक मनुष्याला ही वृत्ती पशुवत करण्यास पुरेशी ठरते.सहजतेने मिळवण्याची वृत्ती टिकवण्यासाठी ध्यानकृतीत आहे.
समाधान नावाचा अनमोल दागिना मिळवता आला पाहिजे. अन्यथा सगळी धावाधाव व्यर्थ आहे. ध्यानसाधनेनेच हे शक्य होणार आहे. पण आमच्या ध्यानात सतत प्रपंच असल्याने आपली मनावस्था मॉलमधे गेल्यासारखी होते.मॉलमधे गेल्यावर आपण नको त्या गोष्टींची खरेदी करतो.नंतर त्या वस्तू आपल्याकडे धुळ खात पडतात. कधीकधी क्षणभर हा विचार येतो की काय गरज होते हे खरेदी करण्याची?पण वेळ आणि पैसा दोन्ही निघून गेलेला असतो.तेथे उपाय शिल्लक रहात नाही.
ध्यानात ध्यान कशाचे असायला हवे? हे मनाला कळण्यासाठी त्याचे बाह्यध्यान थांबले पाहिजे. अनावश्यक जमवाजमव आयुष्य खाते.
नाथ महाराज म्हणतात,
जन्मा येऊनी नरा। न करी आयुष्याचा मातेरा।।वाचे उच्चारी हरहर।तेणे सुखरूप संसार।। नरदेह मिळुन जर त्याचा उचित लाभ घेता आला नाही तर आयुष्याचे मातेरे व्हायला वेळ लागणार नाही. वाचेने भगवतनामाचा उच्चार म्हणजे सत जीवन जगण्याचा पाया आहे. ध्यान त्याचेच व्हायला हवे.संसारात म्हणजे या भवसागरात त्याशिवाय सुखानुभुती घेता येणार नाही. तसा प्रयत्न करत रहाण्यातच नरदेहाचे सार्थक आहे.
रामकृष्णहरी

from https://ift.tt/8piVPLE

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *