
आधार कार्डची निर्मिती करणाऱ्या ‘युनिक आयडेंडिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया’अर्थात यूआडीएआयने दिलेल्या माहितीनुसार आता यापुढे स्मार्ट आधार कार्ड हे अवैध असणार आहे. त्यामुळे सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारात बनविलेले स्मार्ट आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार नाही, हे नक्की झाले आहे.
आधार कार्डाचे रुपांतर स्मार्ट कार्डमध्ये केल्यामुळे त्यात सुरक्षेविषयक अनेक त्रुटी राहतात. त्यामुळे अशा स्मार्ट आधार कार्डाला अवैध घोषित करत आहोत, असे आधार प्राधिकरणाने म्हटले आहे. यामुळे आता आपल्या सर्वांनामूळ आधार कार्डवर अवलंबून राहावे लागेल.
जर तुम्हाला आधारचे पीव्हीसी कार्ड पाहिजे असेल, तर केवळ 50 रुपये भरुन अधिकृतरीत्या मिळवू शकता. ते यूआडीएआयकडून पोस्टाने पाठविले जाते. मूळ आधार पीव्हीसी कार्डात डिजिटली साईनड् सुरक्षित क्यूआर कोड असतो. ते छायाचित्रासह येते. त्यात लोकसांख्यिकी तपशील असतो, तसेच सर्व सुरक्षा फीचरही त्यात असतात.
मूळ आधार कार्ड मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा!
सर्वप्रथम मूळ आधार कार्ड प्राधिकरणाच्या https://ift.tt/3kIOyrZ या वेबसाईटला भेट द्या.
यानंतर ‘ऑर्डर आधार पीव्हीसी कार्ड’ या पर्यायावर क्लिक करा.
12 अंकी आधार क्रमांक अथवा 28 अंकी नोंदणी आयडी टाकून सुरक्षा कोड भरा.
त्यानंतर तुमच्या मोबाइलवर OTP येईल. त्यानंतर अटी व शर्ती स्वीकृत करा.
OTP पडताळणीस सबमिट बटन दाबल्यानंतर ‘पेमेंट ऑप्शन’ दिसेल. पैसे भरा.
पैसे भरल्यानंतर तुम्हाला याची पावती मिळेल आणि कार्ड पोस्टाने घरपोच येईल.
from https://ift.tt/3nGtmVO