
आपण अनेक माणसं पहातो.त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावितही होतो.पण आपण जस जसे जवळ जातो तसतसा हा प्रभाव कमी होतो.असं कुणाच्या बाबतीत होतं?जे बाहेर एक आणि आत एक जीवन जगत आहेत.पारिवारिक सौख्य मिळवता येणं ही एक तपस्याच आहे. घरात एक वागणं आणि बाहेर ऊक वागणं अशी माणसं आपण अनेकदा पहातो.कदाचित आपणही त्याचा भाग असु शकु.या विरोधाभाषी जगण्याने अतिरिक्त ताण निर्माण झाला नाही तरच नवल!
मी दशक्रियेच्या प्रवचनाला गेलो असता श्रद्धांजली साठी एक कडक कांजीतल्या व्यक्तीने श्रद्धांजली वाहिली.आईबाप हे देवच आहेत वगैरे शब्द त्याने वापरले.तेथील सरपंचांकडे चहापाण्यासाठी जाण्याचा योग आला.जाताना एका कामावर वाळुचे घमेले डोक्यावर घेतलेल्या एका वृद्धेकडे बोट दाखवून सरपंच म्हणाले,मघाशी ज्यां नेत्याने श्रद्धांजली वाहिली ना त्याची आई आहे. एकटीच रहाते.मोलमजुरी करुन जगते.
सज्जनहो आपण अशी दृश्य वारंवार पहात असाल पण आपल्याला काय करायचय?
असाच आपला भाव असतो.आपल्यातला माणुस आणि माणुसकी जागी होत नाही तोपर्यंत हे बेगडी जीवन आनंद देऊच शकणार नाही.चार भिंतीत तुमचं जग कसं असावं?यावर उद्या बोलु.
रामकृष्णहरी
from https://ift.tt/lN5V3pc