
कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र म्हणजे मास्क. लोकांनी केवळ मास्क नव्हे तर शक्य तितका चेहरा झाकणारे N95 मास्क घालणे आवश्यक आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मास्क वापरताना, आपण ते किती वेळा आणि किती दिवस वापरू शकतो? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लोक अनेक दिवस एकाच मास्क घालतात. काही लोक तर सैल आणि अनफिट मास्क घालून फिरतात. मात्र असे मास्क खरोखरच पुन्हा वापरण्यासारखे आहेत का? चला तर मग जाणून घेऊया तुम्ही किती वेळा आणि किती दिवस एकच मास्क वापरू शकता…
खराब मास्क टाळाच : जर तुम्ही 45 मिनिटांसाठी घराबाहेर जाण्यासाठी मास्क घातला असेल आणि नंतर तो काढला असेल, तर त्याचा पुन्हा वापर करण्यात नुकसान नाही. मात्र जर तुम्ही दिवसभर मास्क घातला असेल आणि मास्क घाण होत असेल, तर तो मास्क पुन्हा वापरणे तुमच्यासाठी हानिकारक आहे.
N95 मास्क किती वेळा घालू शकता? : जर तुम्ही दिवसातून काही तासच मास्क घातलात तर तो काही दिवसांतच घाण होईल. CDC नुसार, N-95 रेस्पिरेटर मास्कचा 5 पेक्षा जास्त वेळा वापर केला जाऊ नये.
पुन्हा मास्क वापरण्यासाठी काय करावं? : एक मास्क घातल्यानंतर तुम्ही तो पुन्हा घालण्यापूर्वी काही दिवस बाजूला ठेवा. यामुळे कोणत्याही प्रकारच्या व्हायरसच्या अवशेषांना मरण्यासाठी वेळ मिळेल. मास्कला 24 ते 48 तास विश्रांती द्या, असे तज्ञ मंडळीही सांगतात. परंतु त्यांना जास्त काळ धुळीत ठेवू नका.
मास्क काढताय? मग हात धुवा : मास्क वापरल्यानंतर हात धुवावेत आणि स्वच्छ करावेत ही गोष्ट सांगण्यावर तज्ञ वारंवार भर देत आहेत. मास्कच्या बाहेरील भागाला स्पर्श करणे टाळा. तो दूषित होऊ शकतो.
मास्क फेकून देण्याची योग्य वेळ : मास्कमध्ये कट असेल किंवा फाटला असेल तर तो वापरण्या योग्य नाही. घाणेरडे मास्क देखील पुन्हा वापरू नये. जर मास्क घालून एखाद्याला शिंक येत असेल तर समजून जा की हा मास्क घाण झाला आहे आणि तो वापरता येणार नाही.
मास्क कुठे स्टोर करावेत? : तज्ज्ञांनी मास्कला कागदी पिशवीत ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण तेच मास्क ठेवण्यासाठीचं स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाण आहे.
…तर फेकून द्या मास्क : मास्क नाकाजवळ आणि चेहऱ्याभोवती व्यवस्थित सील केलेला नसेल तर फेकून द्या. विशेषत: N-95 मास्क तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा ते फिट टेस्टेड असतात. जर मास्क फिट नसेल आणि सील बनत नसेल तर हे मास्क हवा फिल्टर करू शकणार नाहीत.
from https://ift.tt/3GFcshS