लग्नानंतर मुलगी सासरी आली कि, त्या काळात ती कुटुंबाचे केंद्र बनते. या परिस्थितीत, नातेसंबंध हाताळणे एक आव्हानात्मक काम असते. कारण कोणत्याही नवीन कुटुंबात मिसळण्यास थोडा वेळ तर लागतोच.

जर मुलीच्या सासूने समंजसपणा आणि प्रेम दर्शवले तर सासू-सासऱ्यांसोबत चांगला संबंध स्थापित नक्कीच होईल. मात्र असे नसेल तर काय करायचे? चला, तर आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने तुम्ही सासू-सासऱ्यांसोबतचे नाते आणखी घट्ट करू शकता…
▪ प्रत्येक कार्यात स्पष्टीकरण देण्याऐवजी शांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या प्रश्नांना आपण प्रतिसाद न दिल्यास कदाचित आपल्या सासूच्या वागण्यात बदल होऊ शकतात.

▪ सासूचे शक्य असेल तिथे कौतुक करा. मात्र हे नाटकी वाटता कामा नये बरं. यामुळेच तुमच्यातील वाद कधी संपतील हे कळणारच नाही.
▪ आपण जास्त बोललात तर सासूशी भांडणाची शक्यता आहे, तर शांत रहाणे शहाणपणाचे आहे. त्यांना वादाची एकही संधी देऊ नका.
▪ आजी आणि नात यांच्यात असलेले नाते खूपच सौहार्दपूर्ण असते. त्या तुमच्यापेक्षा तुमच्या मुलांवर जास्त प्रेम करतील. या गोष्टींनी आपण आनंदी असले पाहिजे.

▪ आपले कार्य स्पष्टपणे सांगण्याची हिंमत करणे महत्वाचे आहे. जेणेकरुन कामामुळे भांडण होणार नाही.

from Parner Darshan https://ift.tt/2ZzcQ0F

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *