
आधुनिक योगोपचार पद्धतीत आजाराचे निदान करताना तो आजार कोणत्या कोशात झालेल्या बिघाडामुळे झाला आहे याचा विचार करून अन्नमय कोशासाठी आसने, प्राणमय कोशासाठी प्राणायाम, मनोमय व विज्ञानमय कोशांसाठी ध्यानधारणा अशा प्रकारच्या उपाययोजना सुचविल्या जातात.
पंचकोश ही संकल्पना व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त असून तिचा जागतिक शिक्षण क्षेत्रात व्यक्तिमत्त्व विकासाची भारतीय पद्धती म्हणून अवलंब केला जातो.
आपणमागच्या भागात प्राणमय कोशावर चिंतन केले आहे. आजपासुन आपण मनोमय कोशावर चिंतन करणार आहोत.
पंचभूतांच्या स्थायीप्रभाव गुणांनी बनलेलें संशयात्मक मन व पाच ज्ञानेद्रियें मिळून मनोमय कोश तयार होतो.
पंचतत्वाने त्रिगुण निर्माण होतात.रज,तम आणि सत्व भाव उत्पत्ती त्याचे स्थायी भाव आहेत.परंतु पंच ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने हा त्रिगुणात्मक विकास योग्य दिशेने नेता येणे शक्य आहे.मनात निर्माण होणारे विचार हे ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने होत रहातात.त्यासाठी आपण पहिल्यांदा ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने मन कसं विचार करतं ते संक्षिप्तपणे पाहु.
पंचज्ञानेंद्रियेःडोळे, नाक, कान, जीभ व त्वचा ही माणसाच्या शरीरावर असलेली पाच ज्ञानेंद्रिये आहेत.मन हे सहावे ज्ञानेंद्रिय मानले जाते. ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला विषयांचे ज्ञान होते.
ज्ञानेंद्रिय म्हणजे काय ?
मानवी शरीराला विषयाचे ज्ञान होते त्याला ज्ञानेंद्रिये म्हणतात.डोळे नाक कान ज्ञानेन्द्रिय आहेत.ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने मन विचार करत असतं.त्यातही विषयाचे चिंतन मनात जोमाने घडते.विषय म्हणजे शरिराच्या मागण्या प्राधान्याने पुर्ण करण्याला प्राधान्य देणे हाच मनात निश्चित असणे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विषयसुखाची प्राप्ती करुन घेणे हा सर्व साधारण जगण्याचा कल सर्व प्राणीमात्रांमधे दिसतो.
मला अमुक गोष्ट पाहिजे,हा विचार मनात तयार झाल्याशिवाय कर्म घडत नाही.मागण्या प्रचंड आणि आवक कमी अशी तऱ्हा प्रत्येकाचीच आहे. यात गरिबही अपवाद नाही आणि श्रीमंतही.ज्याच्याकडे काहीच नाही,त्याला वाटते लाखभर रुपये जर मिळवता आले तर प्रपंच चांगला करता येईल.पण लाखो रुपये मिळवुनही माणसं समाधान प्राप्त करु शकत नाही हे सत्य आहे.करोडो रुपयांची संपत्ती जवळ असुनही तो समाधानाचा सदरा अंगावर दिसत नाही याचं खरं कारण काय आहे?(पुढील भागात)
रामकृष्णहरी
from https://ift.tt/kPw4lqF