
शिरूर : करडे येथील श्री. भैरवनाथ माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९८६-८७ ला १० वी ला असणाऱ्या बँचचा स्नेहमेळावा नुकताच विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात नगर,पुणे,मुंबई,महाड येथून आलेले वर्गमित्र व शिक्षक सहभागी झाले होते.
तब्बल ३५ वर्षानंतर काहींची एकमेकांसोबत प्रथमत:च भेट झाल्याने एकमेकांना ओळखणे सुद्धा कठीण झाले होते. अनेकांना नाव सांगून ओळख करून द्यावी लागत होती.त्यामुळे वातावरण काहीसे भाऊक झाले होते.
राष्ट्रगीत तसेच दीपप्रज्वलन व सरस्वती पुजनाने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यानंतर मागील ३५ वर्षाच्या काळात निधन झालेले शिक्षक पठाण सर,शेलार सर,गरूड सर व गाढवे सर आणि मित्रपरिवारातील अर्जुन खोमने,संभाजी बांदल,दत्तात्रय देशमुख,दत्तात्रय पोपळघट,संगिता जगदाळे,दौलत गायकवाड,हिरामन चव्हाण,भाऊसाहेब कोळेकर,भाऊसाहेब बेंद्रे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तत्कालीन मुख्याध्यापक आर. बी. आवारी सरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. तत्कालीन शिक्षक आवारी मँडम,वाळुंज सर,दुर्गे सर,कोरेकर सर व खास कार्यक्रमासाठी मुंबईहून आलेले गोरे सर या सर्वांचा सर्व वर्ग मित्रांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यानंतर वर्गमित्रांपैकी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.तसेच ललिता लंघे धुमाळ यांचा मुलगा क्लास वन ऑफीसर झाला त्याबद्दल त्यांचा व फिरोदिया हायस्कूल अ.नगर चे प्राचार्य वर्गमित्र उल्हास दुगड यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्येक्रमाचे सुत्रसंचालन जगन्नाथ साळुंके यांनी केले.तसेच प्रस्ताविक उल्हास दुगड यांनी केले.
सर्व वर्ग मित्रांनी आपला परिचय करून दिला तसेच शालेय जीवणातील आठवणी व त्यानंतरच्या ३५ वर्षातील आयुष्याच्या प्रवास कसा झाला याबद्दल सांगीतले.त्यानंतर आलेल्या सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे भरभरून कौतुक केले.अध्यक्षीय भाषणात आवारी सरांनी सर्वांचे कौतुक तर केलेच पण करडे येथे राहत असतानाच्या भरपुर आठवणी सांगीतल्या.मी मुख्याध्यापक असतांना पवार साहेब चार वेळा व अजितदादा बऱ्याच वेळा विद्यालयात आल्याचे सांगीतले.तसेच पवार साहेब व अजितदादा जेव्हा जेव्हा प्रचारानिमित्त करड्याला आले तेव्हा विद्यालयाची भेट घेऊनच जायचे असे आवर्जुन सांगीतले.
स्नेहसंमेलनासाठी सर्व वर्गमित्र व शिक्षक मिळुन जवळपास ५० जण उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष रमेश जासूद, बबन किसन वाळके, रामचंद्र जगदाळे, चंद्रशेखर भोईटे, माजी सैनिक तुकाराम वाळके, लता बांदल म्हस्के,भारती गवळी आबनावे व सर्व वर्ग मित्रांनी खूप प्रयत्न केले.
शेवटी आभाराचा कार्यक्रम रमेश जासूद यांनी करतांना विद्यालयाला रोख स्वरूपात देणगी देत असल्याचे जाहीर केले.तीन तपानंतर भेटल्याने सर्वांचे आठवण म्हणुन फोटो काढण्यात आले व नंतर स्नेहभोजनानंतर कार्येक्रमाचे सांगता झाली.
from https://ift.tt/yXVU25H