मित्रांनो 
कोणतही संगीत बेसुर वाजलं की संगीताचं काडीमात्र ज्ञान नसणारा सुध्दा दोष काढतो. सुमधूर वाजणाऱ्या संगीताविषयी जाणून घेण्यासाठी क्वचितच मोजकेच तयार होतात.
तसचं……
प्रापंचिक संगीत सुमधूर वाजत असेल तर या समस्त जीवसृष्टीच्या पालकाचे आम्ही आभार मानायला हवेतना!
जसं संगीत बेसुर वाजलं की अज्ञान्यालाही कळतं,तसं प्रापंचिक असमतोल निर्माण झाला,प्रापंचिक संगीत बेसुर वाजु लागलं की घरातील प्रत्येक सदस्याला याची जाणीव होते.अनेकदा ही घुसमट बोलताही येत नाही.

पण प्रापंचिक संगीतकारहो..
तुम्हीच निर्माते आहात प्रापंचिक सुमधुर संगीताचे.हे आयुष्यभर सुमधूर वाजावं असं कुणाला वाटणार नाही?
पण त्यासाठी पैसा कमावण्याबरोबरच प्रत्येकाची मन जपण्यासाठी मानसिकता शुद्ध आणि प्रसन्न ठेवण्यासाठी आपण काय करता?
माझ्या अनुभवानुसार अध्यात्मिक जीवनशैली हा जगत्श्रेष्ठ पर्याय आहे.मी फार ज्ञानी,तज्ञ,पंडीतआहे असा माझा कोणताही दावा नाही.

संत कबिर म्हणतात,”पोथ्या, ग्रंथ वाचुन आजपर्यंत कुणीही पंडित झाला नाही.
“पोथी पढ,पढ जग मुवा पंडीत भया न कोई।
“ढाई अख्खर प्यार के पढे सो पंडीत होई।।
“प्रेम”हे अडीच अक्षर हा जन्म सार्थकी लावण्यासाठी पुरे आहेत.
जसं हर्मोनियम आहे,हात आहेत.पण वाजवण्याची कला प्राप्त नाही.मग त्यामधून बेसूर संगीतच ऐकायला मिळणार.पण जर ते शिकवणारा भेटला तर….सुमधूर संगीतच बाहेर पडणार.
प्रपंच हा एक हार्मोनियमच आहे. त्यामधुन आनंदसंगीत बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक वाटाड्याची गरज आहे.

आपण अस्तिक असा नास्तिक असा तुम्हाला हे चिंतन आवडणारच.कारण मी कोणत्याही भाकड,भ्रामक कथा सांगणार नाही.सारं विज्ञानाच्या कसोटीवर तावुन सुलाखून पहाता येईल.जे सांगेल ते थेट ह्रदयात उतरुनच.
जे आवडेल ते नक्की माझ्या गुरुदेवांचं आहे. जे आवडणार नाही ते माझं मला परत करा.सर्वांच्या परिवारात आनंदाचं संगीत ऐकायला मिळावं,अगदी शत्रुच्या सुध्दा. हाच एक शुद्धभाव.मला आनंद वाटता येतो तेव्हा माझे गुरुदेव माझ्यावर कृपेचा वर्षाव करतात.याहुन जीवनाची वेगळी सार्थकता नकोच.
जय जय राम कृष्ण हरी

from https://ift.tt/3oUjisa

By News

Leave a Reply

Your email address will not be published.