
पारनेर : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण मिळत आहे. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांचे कामही आदर्शवत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केले.
तालुक्यातील सावरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना गणवेशाचे वाटप सभापती दाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शासनाच्या सर्व शिक्षा अभियान योजने अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात येते. सावरगाव येथील ४० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजनही श्री. दाते यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियंकाताई खिलारी, शिवसेना उपतालुका प्रमुख पंढरीनाथ उंडे, कर्जुले हरेश्वरचे माजी सरपंच साहेबराव वाफारे, एकनाथ दाते, दिपकराव उंडे, तंटामुक्ती अध्यक्ष गोपीनाथ घुले, पत्रकार विजय उंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
यामध्ये क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजना २०२०-२१ अंतर्गत श्री हनुमान मंदिर सुशोभिकरण करणे- १५ लक्ष, क वर्ग तीर्थक्षेत्र योजने अंतर्गत सन २०२१-२२ श्री हनुमान मंदिर प्रवेशद्वार सावरगाव फाटा -१५ लक्ष, मानेवाडी समाज मंदिरासमोरील पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ३ लक्ष, गोडसेवाडी येथे हनुमान मंदिर रस्ता काँक्रीट करणे ७ लक्ष अशा कामांचा समावेश आहे
यावेळी सरपंच सुरेखाताई मगर, उपसरपंच प्रदीपशेठ गुगळे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चिकणे, ग्रामपंचायत सदस्य पर्वती चिकणे,ग्रामपंचायत सदस्य इंद्रवन माने,चेअरमन शिवाजी माने,व्हा.चेअरमन आनंदा गांजे,भाऊशेठ गोडसे, देवरामशेठ मगर,सुंदरशेठ माने,माजी चेअरमन रोहिदास गोडसे,लहू गोडसे,दत्ता माने, जनार्दन माने,नामदेव माने, बबन माने,पंढरीनाथ माने महाराज, शंकर माने, बाळासाहेब गोडसे, विष्णू माने,विठल गोडसे,सोनू गोडसे,बबन चिकणे,अशोक चिकने,अक्षय चिकने,दशरथ चिकने,रामदास चिकणे, भरतरीनाथ गोडसे,बाजीराव गोडसे,संदीप गोडसे, बाळासाहेब शिरतार,रणधीर शिंदे,कृष्णा वाडेकर,विष्णू चिकने,पोपटशेठ चिकणे, आत्मारामशेठ माने, म्हातारबा गायखे,अर्जुन चिकने, प्रकाश चिकणे,योगेश चिकणे, सुनील माने,योगेश माने, सुदर्शन माने,किरण माने,गणेश चिकने, दत्ता चिकणे, नानाभाऊ चिकणे, बबन सूनसुळे, सौरभ चिकने, मोहन माने,मारुती माने,गोरख शिंदे,दीपक गोडसे, गोरख गोडसे
नवनिर्वाचित शिवसेना युवासेना पदाधिकारी शिवसेना शाखाप्रमुख संदीप पंढरीनाथ चिकने,युवासेना शाखाप्रमुख अक्षय नामदेव माने,शिवसेना उपशाखा प्रमुख सुनील पंढरीनाथ चिकने,शिवसेना उपशाखा प्रमुख जालिंदर शिंदे,युवासेना उपशाखा प्रमुख संपत अर्जुन गोडसे, युवासेना उपशाखा प्रमुख दादाभाऊ विष्णू चिकणे,महिला आघाडी प्रमुख सुवर्णा संदीप गोडसे,उपप्रमुख स्वाती गोरख शिंदे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
from https://ift.tt/3qOLkX1