जगातील ‘हे’ देश आकाराने सर्वात लहान!

Table of Contents

जगात असे काही देश आहे ज्यांचा आकार आणि लोकसंख्या जाणून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. आज आपण अशाच काही देशांची यादी आपल्या माहितीस्तव घेऊन आलो आहोत…
▪ माल्टा : हा भूमध्य सागरातील सात बेटांचा एक समूह आहे. ज्याचे क्षेत्रफळ 316 वर्ग किमी आहे. तर या देशाची लोकसंख्या साडेचार लाख आहे.

▪ मालदीव : लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील हा आशियातील सर्वात छोटा देश आहे. 298 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या या देशाची लोकसंख्या साडेचार लाख एवढीच आहे.
▪ सेंट किट्स आणि नेव्हिस : 1983 मध्ये स्वतंत्र झालेल्या या देशाचे क्षेत्रफळ 261 वर्ग किलोमीटर एवढे आहे. ज्यात सेंट किट्स 168 आणि नेव्हिस 93 वर्ग किमी आहे. या देशाची लोकसंख्या 50 हजार आहे.
▪ मार्शल आयलंड : हा 100 पेक्षा अधिक बेटांचा समूह आहे. त्याची लोकसंख्या जवळपास 62 हजार आहे. या देशाचा स्वतःचा ध्वज आणि संविधान असून येथील मुद्रा अमेरिकन डॉलर आहे.

▪ लिचटेन्स्टीन : केवळ 160 वर्ग किमीमध्ये पसरलेला हा देश ऑस्ट्रिया आणि स्विझर्लंडच्यामध्ये आहे. या ठिकाणची लोकसंख्या 40 हजार असून प्रती व्यक्ती जीडीपीच्या हिशोबाने हा जगातील सर्वात श्रीमंत देश आहे.
▪ सॅन मॅरीनो : या देशाची लोकसंख्या 30 हजार असून, क्षेत्रफळ 61 वर्ग किमी आहे. इटलीची सीमा असलेला हा देश युरोपचा सर्वात प्राचीन गणतंत्र देश आहे. या देशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील गाड्यांची संख्या लोकांच्या संख्येपेक्षा जास्त आहे.
▪ तुवालू : अवघ्या 4 बेटांनी मिळून बनलेला हा देश आहे. जो प्रशांत महासागरामध्ये हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी आहे. या देशाची लोकसंख्या अवघी 12 हजार आहे.

▪ नॉरू : केवळ 21 वर्ग किमीमध्ये पसरलेला हा देश जगातील सर्वात छोटे बेट असलेला देश आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास 9 हजार आहे. येथे नारळाचे उत्पादन अधिक होते.
▪ मोनॅको : हा जगातील दुसरा सर्वात लहान देश आहे. कारण याचे क्षेत्रफळ केवळ 2 वर्ग किमी आहे. येथील लोकसंख्या जवळपास 40 हजार असून हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे.
▪ व्हॅटिकन सिटी : हा जगातील सर्वात लहान देश आहे. अवघ्या 100 एकरमध्ये पसरलेला हा देश रोमने घेरलेला आहे. याला पवित्र देश असे देखील म्हटले जाते, कारण या ठिकाणी जगातील सर्वात मोठे कॅथोलिक चर्च आहे.

from https://ift.tt/3GG1CYL

Leave a Comment

error: Content is protected !!