जगातला सर्वात महागडा कीटक !

Table of Contents

आज आपण एका अशा जीवाबाबत जाणून घेणार आहोत. जो पाळण्यासाठी लोक लाखो रूपये खर्च करतात. ज्याबाबत अधिक जाणून घेतल्यावर तुम्ही हैराण व्हाल एवढं नक्की.

हा दुर्मीळ कीटक स्टॅग बीटल नावाने ओळखला जातो. या कीटकाच्या किंमतीत तुम्ही एखादं घर खरेदी करू शकता. विशेष बाब म्हणजे हा कीटक खरेदी करण्यासाठी स्पर्धा लागली आहे.
लोक या कीटकाला खरेदी करण्यासाठी धडपडतात. कारण हा कीटक एखाद्या व्यक्तीला रातोरात कोट्याधीश बनवू शकतो. या कीटकाचा आकार 2 ते 3 इंचाचा असतो. पृथ्वीवरील सर्वात छोट्या, विचित्र आणि दुर्मीळ प्रजातींपैकी स्टॅग बीटल हा एक कीटक आहे.
स्टॅग बीटल हा एक लुकानिडे प्रजातीचा कीटक असून तो दुर्मीळ असल्या कारणाने इतका महाग असतो. या कीटकाला तुम्ही त्याच्या डोक्यावर निघालेल्या शिंगानी ओळखू शकता. काही वर्षाआधी एका जपानी ब्रीडरने आपल्या स्टॅग बीटलला साधारण 65 लाख रूपयांना विकलं होतं. काही दाव्यांनुसार, यापासून अनेक औषधं तयार केली जातात.
हा कीटक सामान्यपणे उष्ण ठिकाणांवर आढळतो. हिवाळ्यात खत किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली उष्ण ठिकाणीच ते जिवंत राहू शकतात. हा कीटक साधारण 7 वर्ष जिवंत राहतो. आता तर जगभरात या कीटकाची तस्करीही केली जात आहे. धक्कदायक बाब म्हणजे भारतातही याचं प्रमाण वाढलं आहे.

from https://ift.tt/H1A4OKU

Leave a Comment

error: Content is protected !!