जवळपास सर्वच चिप्सची पाकिटं खूप फुगलेली असता. पाकिट उघडल्यानंतर त्यातून हवा बाहेर पडते. दरम्यान अनेकांना असे वाटते, की गॅसचा वापर चिप्स तुटू नयेत म्हणून केला जातो. पण तसं नाही. चिप्सच्या पाकिटामध्ये गॅसचा वापर दुसऱ्या कारणांसाठी केला जातो आणि त्याचा गॅसही वेगळा असतो. त्याबाबत जाणून घेऊयात…
तर चिप्सच्या पाकिटांमध्ये नायट्रोजन वायू भरला जातो. त्यामागे विशेष कारण आहे. नायट्रोजन वायू रंगहीन, गंधहीन असतो, त्याला कोणत्याही प्रकारची चव नसते. तसंच त्याची प्रतिक्रियाशीलताही कमी असते. त्यामुळे चिप्सच्या पाकिटमध्ये नायट्रोजन गॅस भरणं अधिक सुरक्षित असतं. नायट्रोजनमुळे चिप्स पाकिटांची वाहतूक करणं सोपं होतं. तसेच, चिप्स अधिक काळ कुरकुरीत राहतात.
चिप्सच्या पाकिटमध्ये हवा भरण्यामागे आणखी एक वैज्ञानिक कारण आहे. नायट्रोजन हा ऑक्सिजनपेक्षा कमी प्रतिक्रियाशील वायू असतो. त्यामुळे चिप्सच्या पाकिटात नायट्रोजन वायू भरला जातो आणि चिप्स अधिक काळ टिकतात.

from https://ift.tt/yH42TmM

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *