
घरात धान्य साठवण्याची आपल्याकडे फार जुनी परंपरा आहे. परंतु, साठविलेल्या धान्यांना अनेकदा वातावरणातील बदलांमुळं फटका बसतो. या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात ठेवलेले धान्य सुरक्षित राहील…
1. कडुलिंबाची पाने : धान्य ठेवण्यापूर्वी पेटी नीट धुवा आणि उन्हात चांगली वाळवा. मग त्यात कडुलिंबाची पाने टाका. यामुळेकिडे वाढत नाहीत आणि जर किडे असतील तर ते मरतात.
2. लाल मिरची : संपूर्ण लाल मिरचीचा वापर केला जाऊ शकतो. पिठात अख्खी लाल तिखट ठेवल्याने किडे पडत नाहीत आणि पीठ खराबही होत नाही.
3. माचिस : तुम्ही डाळी आणि धान्य यांच्यामध्ये माचीच्या काड्या ठेवू शकता. माचीसच्या काड्यांमध्ये सल्फर आढळते. त्यामुळे डाळी आणि धान्यामध्ये आढळणारे कीटक मरतात आणि धान्य सुरक्षित राहते.
from https://ift.tt/zi0PneB