हल्ली स्वयंघोषित शिक्षक होण्यासाठी काही पात्रता लागत नाही,हे अगदी खरे आहे. मोबाईल फोनने तर त्याची भारीच व्यवस्था केले आहे.आपली मुलं हुषार व्हावीत हा सर्व आईबाबांचा प्रयत्न असतोच. पण ती अतिहुषार व्हावीत हा प्रयत्न करणाराही एक वर्ग आहे. आणि हा पालकांचा विकपॉईंट शोधुन त्यांना गिऱ्हाईक करणाराही एक वर्ग सज्ज आहे.ऑनलाईन पुढच्या पिढ्या बरबाद करणार हे सत्य आता लपुन राहिलेलं नाही.
आता एक आनंदाची बाब समोर येत आहे की जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारु लागल्याने इंग्लिश स्कुलवाले आपला गाषा गुंडाळु लागले आहेत.मागे येऊन गेलेला एक चित्रपट शिक्षणाच्या आईचा घो आपल्या चांगलाच लक्षात राहिला असेल.मुलांकडून अवास्तव इच्छा ठेवल्यावर काय होतं याची सुंदर मांडणी त्यात केली आहे.
कौटुंबिक यश संपादन केलेला मार्गदर्शक मग तो जर शिक्षक असेल तर संस्कार भरभरून मिळणार यात शंका नाही.पण असे नसेल तर आपली मुलं तिथं काय शिकणार?पालकांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे.पुर्वी गुरुकुल शिक्षण पद्धतीत शिक्षकाच्या चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व असायचे.आचार्य देवोभव हा संस्कार कशासाठी आहे?देवाची पात्रता आचार्यात म्हणजे शिक्षकात असली तरच पुढचं देवोभव आहे. एकच टेबलावर बसुन विद्यार्थी शिक्षक दारु पित असतील,तेढ निर्माण करण्याचं शिक्षण मिळत असेल तर चांगल्याची अपेक्षा करावीच कशी?
असो आज या निमित्ताने एवढच सांगावसं वाटत आहे की,प्रत्यक्ष समोर गुरु नसताना झालेलं अध्यापन फार परिणामकारक होत नाही हा हल्लीचा अनुभव आहे.त्यामुळे शालोत्तर ऑनलाईनच्या भुलभुलैया पासून आपला पाल्य बाजुला ठेवणं अत्यंत हितावह आहे. गुरुकृपेनेच ज्ञानाची प्राप्ती होते हा नियम मनुष्य बदलु शकत नाही.आपण किती फॉरवर्ड व्हायचं हे ज्याचं त्यानच ठरवायचं आहे. कारण यांत्रिकीकरण म्हणजे मशीन.आपला मुलगा मशीन झाला तर मशीनला भावना नसतात हे वेगळं सांगण्याची गरज आहे का?
रामकृष्णहरी

from https://ift.tt/afUIbPk

By News

Leave a Reply

Your email address will not be published.