आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मतदार ओळखपत्राचा पत्ता बदलू शकता. यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? यासाठी नक्की काय करायचे? त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा…
● सर्वप्रथम नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल https://voterportal.eci.gov.in/ वर लॉग इन करून नोंदणी करा.

● यानंतर ‘Correction of entries in electoral roll’ हा विभाग निवडा.
● नवीन पेज उघडल्यावर फॉर्म 8 दिसेल. त्यावर क्लिक करा.
● आता तुम्हाला मतदार ओळखपत्रात दुरुस्तीचा पर्याय दिसेल.
● या ठिकाणी विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा, तुमचा पत्ता देखील भरा.
● यानंतर काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील. ज्यात पत्ता पुरावा (आधार, परवाना) द्या.

● आता तुम्हाला जी माहिती बदलायची आहे ती निवडा. त्यात नाव असल्यास नावाचा टॅब निवडा आणि आणखी काही असल्यास तो टॅब निवडा.
● आता तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल पत्ता सबमिट करा.
● आता ‘सबमिट’वर क्लिक करा. व्हेरीफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र पाठवले जाईल.

from https://ift.tt/3ftCrgd

By News

Leave a Reply

Your email address will not be published.