✒ सतीश डोंगरे 
शिरूर : शिरूर तालुक्यातील गुनाट गावचे सुपुत्र आणि वसई-विरार चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी वसई येथे बोगस डॉक्टर प्रकरणी केलेल्या कारवाईमुळे त्यांच्यावर गुनाट गावामधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वसई – विरारारमध्ये या मुन्नाभाईला कर्पे यांनी मोठ्या शिताफीने पकडून अटक केली आहे. सुनील वाडकर असे या मुन्नाभाईचे नांव असून तो वसई-विरार महापालिकेचा माजी वैद्यकीय अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या बोगस डॉक्टरकडे ना कोणतही डिग्री आणि ना कोणतेही वैद्यकिय प्रमाणपत्र तरीही दोन हॉस्पिटल सुरु केली होती. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी अधिकृत पदवी प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले असल्याने त्यांवरही कारवाई करण्यात आली, असे पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी सांगितले.
तोतया डाॅक्टर सुनील वाडकर हा वसई ते विरार महामार्गावर ‘हायवे’ आणि नालासोपारा येथे ‘नोबेल’ अशी दोन खासगी रुग्णालये चालवत आहे. त्यांची वैद्यकीय पदवी बोगस असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे आली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे नियोजन पध्दतीने कारवाई करत वाडकर याला अटक केली.
विरार पोलीस ठाण्यात या संदर्भात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अधिनियम 1961 चे कलम 33 तसेच भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 419, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्पे यांनी यापूर्वी ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. वसई येथील शाळेतून बेपत्ता झालेल्या मतिमंद मुलीला शोधण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. भिवंडी येथे एका सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती त्यावेळी कर्पे यांनी अवघ्या दहा तासातच आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. वसईच्या समुद्रकिनारी सापडलेल्या सुमारे तीस फूट लांबीच्या माशाच्या गूढ मृत्यूचा तपास श्री. कर्पे यांनी यशस्वीपणे लावला होता.
श्री. कर्पे यांच्या अशा कामगिरीचा गुनाट गावचे सुपुत्र म्हणून गुनाटकरांना नेहमीच अभिमान वाटत आला आहे. नोकरीनिमित्त ते जरी मुंबईत स्थायिक असले तरी गुनाटच्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली आहे. गुनाट गावचे वैभव असणाऱ्या श्री दत्त मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच देवस्थानची वाटचाल चालू आहे.

from https://ift.tt/3rhDOEd

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *