मुंबई : विलीनीकरण मागणीसाठी सुरु असलेल्या संपामुळे एसटी महामंडळ कोंडी झाली आहे .अद्यापही एसटीचे कर्मचारी परतण्यास अन्स्तुक असून 50 हजार चालक वाहक संपात आहेत .एसटी पूर्वत करण्यासाठी महामंडळने सेवानिवृत्त चालक करार पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे .आणि महामंडळ कडे 389 अर्ज आले आहेत .त्यामुळे एसटी महामंडळ ने आणखी 400 कंत्राट चालक खासगी कंपन्याकडून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
अद्यापही 61 हजार कर्मचारी संपावर असून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही एसटीचा संप मिटलेला नाही . राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनीही कर्मचार्यांना कामावर रुजू होण्यासाठी केलेल्या आवाहनानंतरही कमीच प्रतिसाद मिळत आहे .
एसटी महामंडळ एकूण कर्मचारी संख्या 87 हजार 705. यातील 61 हजार 677 कर्मचारी अद्यापही संपात सामील आहेत .यामध्ये चालक वाह्काचीच संख्या अधिक आहे 27 हजार 687 चालक आणि 22 हजार 846 वाहक अद्यापही कामावर नाहीत तर उवारीत  अनुस्पती असलेल्या कर्मचार्यांमध्ये कार्यशाळा व अन्य कार्यालयीन कर्मचारी आहेत .फक्त 26 हजार 28 कर्मचाराचे उपस्थित]असून यामध्ये चालक वाहकाची संख्या कमी आहे .
दरम्यान एसटीचे चालक वाहक परतण्यास अनुस्तुक असल्याने महामंडळ ने करार पद्धतीने सेवानिवृत्त किवा स्वेच्छेनिवृत्त चालकाची भरती करण्याचा निर्णय घेतला .कंत्राटी पद्धतीने चालकही मनुष्य बळ पुरवणाऱ्या खासगी कंपन्या कडून घेतले जात आहे .सेवानिवृत्त 389 चालकांनी महामंडळ अर्ज केले होते त्यातील 136 चालकच पात्र ठरले आहेत .

from https://ift.tt/33nvgE2

By News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *